PSL ने पाकिस्तानला काय दिलं; IPLच जगात भारी : दानिश कनेरिया

अनेकदा पाकिस्तानी खेळाडू किंवा अधिकारी आयपीएलची तुलना पाकिस्तान सुपर लीग (PSL) शी करतात
IPL vs PSL Comparison danish kaneria pakistan cricket ipl 2022
IPL vs PSL Comparison danish kaneria pakistan cricket ipl 2022sakal

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वोत्तम लीग मानली जाते. पण अनेकदा पाकिस्तानी खेळाडू किंवा अधिकारी आयपीएलची तुलना पाकिस्तान सुपर लीग (PSL) शी करतात. यासाठी वेगवेगळी कारणे आणि तर्क दिला जातात. दरम्यान पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने आयपीएलचे कौतुक केले आहे. याचबरोबर त्याने पीएसएलला नावे देखील ठेवली. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला आहे.

दानिश कनेरिया म्हणतो की आयपीएल ही सर्वात प्रोफेशनल लीग आहे, ज्याने भारतीय क्रिकेटला अनेक टॅलेंटेड खेळाडू देत आहे. त्याच वेळी, पाकिस्तान सुपर लीगने पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी आतापर्यंत काही विशेष केले नाही. आयपीएल प्रत्येक नवीन हंगामात चांगले खेळाडू होत आहे. याउलट आपण पाकिस्तान सुपर लीग (PSL) बद्दल बोललो, तर त्याने पाकिस्तान क्रिकेटसाठी अद्याप काहीही केलेले नाही.

पीएसएलची सुरुवात आयपीएलच्या यशानंतर झाली. पाकिस्तान सुपर लीग 2016 मध्ये सुरू झाली, ज्यामध्ये सुरुवातीला 6 संघांचा समावेश करण्यात आला होता. आता पीएसएलही लवकरच आयपीएलसारखी लिलाव प्रणाली आणू शकते. याबाबतचे संकेत रमिझ राजा यांनी काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यावेळी देखील त्यांनी आयपीएलचेच दाखले दिले होते.

आयपीएल 2022 मधील सर्व संघ मजबूत आहे. विशेष म्हणजे यावेळी दोन नवीन संघांचाही सहभाग आहे, त्यांना हलके घेऊ शकत नाही. आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले होते, तेव्हा त्यात 8 संघ होते. पण आता दहा संघ आहेत. तसेच 2022 च्या मेगा लिलावात अनेक संघाची रूपरेषा बदलली असून आयपीएलचा 15 वा हंगाम हा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com