KKR vs PBKS: कोलकाताने पंजाबचा सहा विकेट्सनी केला पराभव! रसेलने खेळली तुफानी खेळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 KKR vs PBKS :

KKR vs PBKS: कोलकाताने पंजाबचा सहा विकेट्सनी केला पराभव! रसेलने खेळली तुफानी खेळी

IPL 2023 KKR vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जचा पाच विकेट्सने पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या विजयासह कोलकाताचे 11 सामन्यांत 10 गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने कोलकात्यासमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य कोलकाताने शेवटच्या चेंडूवर पाच विकेट्स गमावून पूर्ण केले.

KKR vs PBKS Live Score: कोलकाताला मोठा धक्का! कर्णधार राणा अर्धशतक ठोकून आऊट

अर्धशतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर नितीश राणा आऊट झाला. त्याने 16व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

कोलकाता नाईट रायडर्सची पडली तिसरी विकेट

115 धावांवर कोलकाता नाईट रायडर्सची तिसरी विकेट पडली. व्यंकटेश अय्यर 13 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. कोलकाताची धावसंख्या 15 षटकांत 3 बाद 122 अशी आहे.

कोलकाताने गाठला 100 आकडा, कर्णधार नितीश राणा अन् वेंकटेश अय्यर आक्रमक

13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नितीश राणाने चौकार मारून कोलकात्याच्या 100 धावा पूर्ण केल्या आहे. सॅम करनच्या चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली आणि यष्टीरक्षकाकडून थर्ड मॅनकडे चार धावा गेल्या.

KKR vs PBKS Live Score: पॉवरप्लेनंतर जेसन रॉयचे वादळ थांबले!

64 धावांच्या स्कोअरवर कोलकाता नाईट रायडर्सची दुसरी विकेट पडली. जेसन रॉय 24 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार मारले. आठ षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या दोन बाद ६७.

पॉवरप्लेनंतर कोलकाताचा स्कोर  52/1

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने पॉवरप्लेमध्ये एक गडी गमावून 52 धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाज 15 धावा करून बाद झाला, पण कर्णधार नितीश राणा आणि जेसन रॉय क्रीजवर आहेत.

दोघांनीही चांगली फलंदाजी करत आपल्या संघाची धावसंख्या 50 धावांच्या पुढे नेली आहे.

KKR vs PBKS Live Score: कोलकात्याची पहिली विकेट 38 धावांवर..., गुरबाज 15 धावा करून आऊट

38 धावांवर कोलकाता नाईट रायडर्सची पहिली विकेट पडली आहे. रहमानउल्ला गुरबाज 12 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. नॅथन एलिसने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले.

पंजाबचा डाव संपला, कोलकाताला दिले 180 धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याचवेळी, शेवटी शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

फिरकी गोलंदाजांनी कोलकात्यासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी घेतले. हर्षित राणाला दोन बळी मिळाले. सुयश शर्मा आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

KKR vs PBKS Live Score: पंजाबचा संघ अडचणीत! 3 स्फोटक फलंदाज तंबुत

पंजाब किंग्जची तिसरी विकेट 53 धावांवर पडली आहे. लियाम लिव्हिंगस्टोन नऊ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. वरुण चक्रवर्तीने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. आता पंजाबचा संघ अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. कॅप्टन धवनसोबत जितेश शर्मा क्रीजवर आहे.

 KKR vs PBKS Live Score: राणाच्या 2 षटकात पंजाबला बसले दोन धक्के!

पंजाब किंग्जची दुसरी विकेट 29 धावांवर पडली. भानुका राजपक्षे खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. हर्षित राणाने या सामन्यात दोन विकेट घेत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. चार षटकांनंतर पंजाब किंग्जची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा आहे.

पंजाबला बसला पहिला धक्का!

21 धावांवर पंजाब किंग्जची पहिली विकेट पडली आहे. प्रभसिमरन सिंग आठ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 12 धावा करून बाद झाला. आता भानुका राजपक्षे कर्णधार शिखर धवनसोबत क्रीजवर आहेत.

KKR vs PBKS Live Score: करो या मरो सामन्यात पंजाब किंग्जने जिंकले नाणेफेक!

कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.