LSG vs MI: प्ले-ऑफची शर्यत रंजक! शेवटच्या षटकात लखनऊने मुंबईच्या तोंडचा घास घेतला हिरावून | IPL 2023 Playoffs Scenarios Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LSG vs MI: प्ले-ऑफची शर्यत रंजक! शेवटच्या षटकात लखनऊने मुंबईच्या तोंडचा घास घेतला हिरावून

LSG vs MI: प्ले-ऑफची शर्यत रंजक! शेवटच्या षटकात लखनऊने मुंबईच्या तोंडचा घास घेतला हिरावून

LSG vs MI IPL 2023 Playoffs Scenarios Points Table : अखेरच्या षटकात मोहसीन खानच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2023 च्या 63 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव केला. या विजयासह सुपर जायंट्स प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवले आहे.

लखनऊ सुपर जायंट्सच्या या विजयानंतर प्ले-ऑफची शर्यत रंजक झाली आहे. कारण लखनऊ आणि चेन्नईचे समान 15-15 गुण झाले आहेत, परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे माहीची CSK पॉइंट टेबलमध्ये सुपरजायंट्सपेक्षा एक स्थान वर आहे.

CSK दुसऱ्या तर सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ 13 सामन्यांत 18 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. या पराभवामुळे मुंबईला कुठेतरी धक्का बसला आहे. मुंबई 13 पैकी 7 सामने जिंकले असून गुणतालिकेत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावरून आता चौथ्या स्थानावर घसरली आहे.

लखनऊकडून 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून सलामीला आलेल्या ईशान किशन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केले. यानंतर रोहित शर्मा 37 धावा करून बाद झाला. इशान किशनने चांगले फटके मारताना अर्धशतक झळकावले. मात्र, तो 59 धावा करून रवी बिश्नोईच्या हाती झेलबाद झाला. रो

यानंतर सूर्यकुमार यादव 7 आणि नेहल वढेरा 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. टीम डेव्हिडने शेवटपर्यंत संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण त्याला तसे करता आले नाही. त्याने 19 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या तर कॅमेरून ग्रीन 4 धावा करून नाबाद परतला.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौकडून मैदानावर एक नवी सलामी जोडी दिसली, ज्यामध्ये क्विंटन डी कॉकसह दीपक हुडा मैदानात आला, पण ही जोडी अपयशी ठरली आणि लखनऊला 12 च्या स्कोअरवर पहिला धक्का दीपक हुडाच्या रूपाने बसला जो 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. येथून क्विंटन डी कॉक आणि कृणाल पांड्या यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 23 चेंडूत 23 धावांची भागीदारी केली. 35 धावांवर लखनऊ संघाने क्विंटन डी कॉकच्या रूपाने तिसरी विकेट गमावली. डी कॉकला 16 च्या वैयक्तिक स्कोअरवर पीयूष चावलाने शिकार बनवले.

35 धावांवर 3 विकेट गमावलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचा डाव कर्णधार कृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉइनिस या जोडीने संभाळला. दोघांनी मिळून यांनी चौथ्या विकेटसाठी 59 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. कृणाल पंड्या फलंदाजी करताना काही अस्वस्थतेमुळे 49 धावांवर रिटायर्ड झाला. क्रुणाल आणि स्टॉइनिस यांनी चौथ्या विकेटसाठी 59 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली.

यानंतर स्टॉइनिसला निकोलस पूरनची साथ मिळाली. लखनऊ संघाने डावाच्या 18व्या षटकात एकूण 24 धावा, 19व्या षटकात 15 धावा आणि शेवटच्या षटकात 15 धावा करत. मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनी 5व्या विकेटसाठी अवघ्या 24 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. लखनऊच्या संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 177 धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसने 47 चेंडूत 89 धावांची खेळी केली. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने 2 तर पियुष चावलाने 1 बळी घेतला.