Gautam Gambhir : गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? लखनौचे मालक भडकले अन्... | LSG sanjiv goenka | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Gambhir

Gautam Gambhir : गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? लखनौचे मालक भडकले अन्...

Gautam Gambhir IPL 2023 : आयपीएल एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने लखनौचा 81 धावांनी पराभव करून आयपीएल 2023 मधून बाहेर काढले.

मुंबईविरुद्ध लखनौने आधीच आपल्या नांग्या टाकल्या होत्या. संपूर्ण सामन्यात लखनौ कुठेही लढताना दिसला नाही. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबईने लखनौला 183 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तर मुंबई इंडियन्सच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा संघ 101 धावांवर गारद झाला.

या पराभवामुळे संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर नाराज दिसत होता. यानंतर लखनौचा टीम मालक संजीव गोएंकासोबतचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यानंतर गंभीरला चांगलेच ट्रोल केले जाऊ लागले. व्हायरल फोटोवर यूजर्स म्हणतात की, गंभीरच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. त्याची कधीही हकालपट्टी होऊ शकते.

यावेळी गोयंका यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. गंभीर त्यांना समजवण्याचा प्रयत्नही करताना दिसला. लखनौने तिसरे स्थान मिळवून प्लेऑफ गाठले, जिथे त्यांना साखळी फेरीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या मुंबईने पराभूत केले. मात्र, या संपूर्ण सीझनमध्ये लखनौ खूप चर्चेत राहिले. ती प्लेऑफमध्ये पोहोचली असली तरी तिच्या खेळावर बरीच टीकाही झाली होती. बालिश चुकांमुळे लखनौने एलिमिनेटर गमावला.

या सामन्यात लखनौने एक-दोन नव्हे तर अशा अनेक चुका केल्या, ज्या अगदी बालिश होत्या. कामगिरी व्यतिरिक्त लखनौ या हंगामात देखील वादांनी भरले होते. या महिन्याच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याशी संघाचा गोलंदाज नवीन-उल-हक आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात सामना झाला.

यानंतरही दोघेही शांत झाले नाहीत आणि नंतर सोशल मीडियावरही हल्ला चढवला. त्यामुळे लखनौच्या प्रतिष्ठेलाही मोठा फटका बसला. अशा स्थितीत संजीव गोयंका यांच्यासोबतच्या संभाषणाच्या फोटोवरून असे बोलले जात आहे की, हा गंभीरचा लखनौसोबतचा शेवटचा सीझन होता.