
Virat Kohli : कोण प्रिन्स अन् कोण किंग? गिलला गोंजारत लखनौने विराटला डिवचले
Lucknow Super Giants target Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवार 21 मे रोजी शेवटचा लीग सामना खेळल्या गेला. हा सामना आरसीबीसाठी प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. मात्र त्याची शतकी खेळी कामी आली नाही आणि गुजरात टायटन्सने हा सामना 6 गडी राखून जिंकला. या पराभवानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.
आरसीबीच्या या पराभवासह मुंबई इंडियन्सचे प्लेऑफमधील तिकीट निश्चित झाले. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
विराट कोहलीनेही या सामन्यात शतक झळकावले, पण शुभमन गिलच्या शतकाने किंग कोहलीच्या शतकावर छाया पडली. या सामन्याच्या एका दिवसानंतर एलएसजीच्या ट्विटर हँडलवरून गिलच्या कौतुकात एक ट्विट करण्यात आले आहे, ज्यावर चाहते मजा घेत आहेत. काही चाहत्यांच्या मते गौतम गंभीरने हे ट्विट एलएसजीच्या अकाऊंटवरून केले आहे.
खरं तर आयपीएल 2023 च्या लीग फेरीदरम्यान नवीन-उल-हक आणि एलएसजीचा विराट कोहली यांच्यात वाद झाला. सामन्यानंतर गौतम गंभीरही या भांडणात अडकला. तेव्हापासून विराट आणि नवीन यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे.
शुभमन गिलचा फोटो शेअर करताना एलएसजीच्या ट्विटर अकाऊंटवरून लिहिले होते, 'प्रिन्स? पण तो आधीच राजा आहे. वास्तविक किंग विराटचे नाव घेऊन चाहत्यांना लावत आहे, त्यामुळे विराटला टार्गेट करण्यासाठी एलएसजीने हे ट्विट केल्याचे मानले जात आहे.