
Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सला मिळणार नवा कोच; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे नाव आघाडीवर
Lucknow Super Giants Coach : लखनौ सुपर जायंट्सला आयपीएल 2024 च्या हंगामात नवा प्रशिक्षक मिळणार आहे. सध्याचे लखनौचे कोच अँडी प्लॉवर यांचा करार संपत आला आहे. अँडी फ्लॉवरच्या मार्गदर्शनाखाली लखनौने पहिल्या दोन हंगामात प्ले ऑफ गाठत समाधानकारक कामगिरी केली आहे.
मात्र तरी देखील लखनौ सुपर जायंट्स आणि खुद्द अँडी फ्लॉवर हे दोघेही हा करार वाढवण्यासाठी उत्सुक दिसत नाहीयेत. सध्या तरी फ्लॉवर यांच्या जागी ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक जस्टीन लँगरचे नाव आघाडीवर आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जस्टीन लँगर आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोघे बोलणी करत आहेत. मात्र अजून फ्रेंचायजी किंवा लँगरने याबाबत कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.
अँडी फ्लॉवर यांचा करार हा आयपीएल 2023 मध्येच संपला होता. फ्लॉवर सध्या अॅशेस मालिका खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रभारी बँटिंग कोच आहेत. लखनौ जरी आपला प्रमुख प्रशिक्षक बदलत असला तरी संपूर्ण प्रशिक्षक स्टाफ बदलण्याबाबत ते उत्सुक नाही.
संघाचा मेंटॉर म्हणून गौतम गंभीर, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विजय दहिया हे कायम राहणार आहेत. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल, फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्स आणि फिरकी कोच प्रविण तांबे हे देखील कायम राहणार आहेत.
लखनौ सुपर जांयट्सचा कोचिंग स्टाफ :
मेंटॉर : गौतम गंभीर
मुख्य प्रशिक्षक : अँडी फ्लॉवर
सहाय्यक प्रशिक्षक : विजय दहिया
फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक : प्रविण तांबे
वेगवान गोलंदाज प्रशिक्षक : मॉर्ने मॉर्केल
क्षेत्ररक्षक प्रशिक्षक : जॉन्टी रोड्स
सायकोथेरपिस्ट : जेम्स पिप
स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच : वॉरेन अँड्र्यु