Mohammed Shami Hasin Jahan: 'हॉटेलमध्ये मुलींसोबत...' पत्नी हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर केले आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Shami and Hasin Jahan

Mohammed Shami Hasin Jahan: 'हॉटेलमध्ये मुलींसोबत...' पत्नी हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर केले आरोप

Mohammed Shami and Hasin Jahan : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय फास्ट बॉलरचे सेक्स वर्कर्ससोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हसीन जहाँने 2018 मध्ये पहिल्यांदा शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर घरगुती हिंसाचार आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र, शमीने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. जानेवारी 2023 मध्ये कोलकाता न्यायालयाने शमीला हसीन जहाँला मासिक 50,000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

मात्र हसीन जहाँ त्यावर नाराज होती. तिने भारतीय वेगवान गोलंदाजाकडून दरमहा 10 लाखांची मागणी केली होती. हसीन जहाँसोबतच्या कायदेशीर लढाईत शमीला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. या काळात शमीला पोलिस चौकशी आणि वॉरंटलाही सामोरे जावे लागले आहे.

हसीन जहाँच्या सर्वोच्च न्यायालयात ताज्या याचिकेत शमी हुंडा मागायचा. याशिवाय हसीनने शमीवर वेश्यांसोबत अवैध विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. बीसीसीआयने दिलेल्या हॉटेल रूममध्ये टीम इंडियाच्या दौऱ्यांदरम्यान शमीने हे कृत्य केल्याचा त्यांचा दावा आहे.

त्याने सांगितले की, शमी जेव्हा परदेश दौऱ्यावर असायचा तेव्हा तो मुलींना बीसीसीआयने दिलेल्या हॉटेलच्या रूममध्ये बोलावत असे. ते अजूनही तेच करतात. शमी यासाठी दुसरा मोबाईल वापरतो.

हसीन जहाँने याचिकेत आरोप केला आहे की, शमीने आपला दुसरा मोबाईल फोन नंबरचा वापर वेश्यांसोबतचे संबंध सांभाळण्यासाठी केला. शमी अजूनही सेक्स वर्कर्ससोबत बोलत आहे.