Mohit Sharma GT vs LSG : गुजरातची 'मोहित' करणारी गोलंदाजी! हार्दिकने गेल्या हंगामातील कित्ता याही हंगामात गिरवला| IPL 2023 | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GT vs LSG IPL Mohit Sharma

Mohit Sharma GT vs LSG : गुजरातची 'मोहित' करणारी गोलंदाजी! हार्दिकने गेल्या हंगामातील कित्ता याही हंगामात गिरवला

GT vs LSG IPL Mohit Sharma : अखेर पांड्या बंधूंमधील द्वंद्व हार्दिक पांड्याने जिंकले. गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 56 धावांनी मोठा पराभव करत आपले 11 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थान मजबूत केले. तसेच प्ले ऑफच्या रिंगणात आपला एका पाय टाकला. विशेष म्हणजे गतवर्षी आपला पहिला हंगाम खेळणाऱ्या गुजरातने सर्वात आधी 16 गुणांची कमाई केली होती. हाच कित्ता याही हंगामात गिरवत गुजरातने सर्वात आधी 16 गुणांची कमाई केली.

गुजरातच्या 228 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौने चांगली सुरूवात केली खरी मात्र गुजरातच्या कसलेल्या गोलंदाजींने लखनौला 171 धावात रोखले. मोहित शर्माने 4 षटकात 4 विकेट्स घेत लखनौच्या फलंदाजीला मोठे खिंडार पाडले. लखनौकडून क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 70 धावा केल्या.

गुजरात टायटन्सने ठेवलेल्या 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने देखील दमदार सुरूवात केली. सलामीवीर कायल मेयर्स आणि क्विंटन डिकॉकने 8 षटकात 88 धावांची सलामी दिली अखेर मोहित शर्माने मेयर्सला 48 धावांवर बाद करत लखनौला पहिला धक्का दिला.

गुजरातने दमदार सुरूवात करणाऱ्या लखनौला दोन धक्के दिले. मेयर्स बाद झाल्यानंतर क्विंटन डिकॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्याचा जोडीदार दीपक हुड्डाला मोहम्मद शमीने 11 धावांवर बाद केले. त्याने या 11 धावा करण्यासाठी 11 चेंडू घेतले.

दीपक हुड्डा बाद झाल्यानंतर आलेला मार्कस स्टॉयनिस 4 धावांची भर घालून माघरी परतला. त्यानंतर राशीद खानने 41 चेंडूत 70 धावांची खेळी करत झुंज देणाऱ्या क्विंटन डिकॉकला माघारी धाडत लखनौला मोठा धक्का दिला. पाठोपाठ पूरन देखील 3 धावा करून माघारी परतला. यामुळे कधी काळी 2 बाद 130 धावा असणाऱ्या लखनौची अवस्था 18 व्या षटकात 5 बाद 153 धावा अशी झाली.

यानंतर 11 चेंडूत 21 धावा करत आयुष बदोनीने हरलेली लढाई लढण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहितने त्याला बाद करत लखनौचा सहावा फलंदाज बाद केले. त्यानंतर कृणाल पांड्याला शुन्यावर बाद करत मोहितने आपला चौथा बळी टिपला. अखेर लखनौला 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या गुजरातने 56 धावांची सामना जिंकला.

आयपीएलच्या 51 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय फार महागात पडला. गुजरात टायटन्सने 20 षटकात 2 बाद 227 धावा ठोकत लखनौच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 51 चेंडूत 94 धावा ठोकल्या. तर वृद्धीमान साहाने 43 चेंडूत 81 धावांची धडाकेबाज खेळी केली. लखनौकडून आवेश खान आणि मोहसीन खान यांनाच विकेट घेण्यात यश मिळाले.

(Sports Latest News)