MS Dhoni DC vs CSK VIDEO : दिल्लीत धोनीच्या चेन्नईची बस घेरली, दिल्लीकरांचा चांगलाच झाला खोळंबा | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni DC vs CSK Team Bus VIDEO

MS Dhoni DC vs CSK VIDEO : दिल्लीत धोनीच्या चेन्नईची बस घेरली, दिल्लीकरांचा चांगलाच झाला खोळंबा

MS Dhoni DC vs CSK Team Bus VIDEO : भारताची माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यंदाचा आयपीएलचा हंगाम आपला शेवटचा हंगाम आहे असं कधीही जाहीर केलेलं नाही. तरी महेंद्रसिंह धोनीचे पर्यायाने चेन्नई सुपर किंग्जचे देशभरातील फॅन्स धोनी ज्या स्टेडियमवर जात आहे त्या स्टेडियमवर तुफान गर्दी करत आहेत. चेन्नई विरूद्धचा सामना जरी मुंबईचा विरूद्ध असो वा आरसीबीचा विरूद्ध हवा तर चेन्नईचीच असते.

चेन्नईचा हा थला आज आपली आयपीएळ लीग स्टेजमधील संभाव्यरित्या शेवटची मॅच अरूण जेटली स्टेडियमवर खेळत आहे. आजच्या सामन्यासाठी स्टेडियमवर येताना धोनीच्या सीएसकेच्या बसला धोनीच्या फॅन्सनीच घेरले. चाहत्यांची धोनीची एक झलक पाहण्यासाठी झुंबड उडाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर तुफान ट्रॅफिक जाम झाले.

धोनी नाणेफेकीवेळी म्हणाला की, 'आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्ही पहिल्या सामन्यापासूनच जिंकण्यासाठी खेळतोय. आमची प्लेईंग 11 सेम आहे कोणताही बदल नाही. आमच्याकडे संतुलित प्लेईंग 11 आहे. सामना पुढे जाईल तशी खेळपट्टी संथ होईल. त्यामुळे आम्ही फलंदाजी करणार आहोत. अशा स्पर्धांमध्ये काही सामने चांगले जातात काही वाईट आपण प्रत्येक सामन्यातून शिकले पाहिजे. मला वाटते तरूण खेळाडूंनी हेच शिकलं पाहिजे.'

महेंद्रसिंह धोनीने दिल्लीविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वे यांनी 141 धावांची दमदार सलामी देत चेन्नईच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. ऋतुराजने 79 तर कॉन्वेने 87 धावांची दमदार खेळी केली. त्यांनंतर शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांनी अनुक्रमे 9 चेंडूत 22 आणि 7 चेंडूत 20 धावांची खेळी करत चेन्नईला 20 षटकात 3 बाद 223 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)