MS Dhoni : मग आत्ताच ही डोकेदुखी कशाला? धोनीच्या वक्तव्याने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

MS Dhoni : मग आत्ताच ही डोकेदुखी कशाला? धोनीच्या वक्तव्याने खळबळ

महेंद्र सिंह धोनी यंदाच्या आयपीएलनंतर निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सध्या क्रिकेट जगतात रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मी नाही तर तुम्हीच मी रिटायर होणार असल्याचं ठरवून टाकलं, असं विधान करत निवृत्तीच्या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा या चर्चेला उत आला आहे. (MS Dhoni said There is 8-9 months left for auction I will be there for CSK everytime lots of time to decide)

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने हा सामना 15 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं. दरम्यान, हर्ष भोगले यांनी थेट धोनीला त्याच्या निवृत्तीसंदर्भात विचारे असता आत्ताच ही डोकेदुखी कशाला? असा उलट सवाल धोनीने यावेळी केला. (Latest Sport News)

नेमकं काय म्हणाला धोनी?

हर्ष भोगले यांनी विचारले, तू इथे येऊन पुन्हा खेळशील का? यावर धोनी हसला. "मला माहित नाही. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी आठ-नऊ महिने आहेत. डिसेंबरच्या आसपास एक छोटासा लिलाव होणार आहे, मग आता ही डोकेदुखी का करावी. (Latest Sport News)

माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, मी एक खेळाडू म्हणून राहीन किंवा त्यांच्यासोबत कोणत्या तरी भूमिकेत असेन मला नक्की माहीती नाही. मी सीएसकेसोबतच राहीन.'' असं धोनीने यावेळी स्पष्ट केलं.

तसेच, मी 31 जानेवारीपासून घराबाहेर आहे. मी 2 किंवा 3 मार्चपासून सराव करत आहे, तर बघूया, या क्षणी माझ्याकडे हा निर्णय घेण्यासाठी भरपूर वेळ आहे." असही धोनी यावेळी म्हणाला. (Latest Sport News)

धोनी पुढच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना कदाचित दिसणार नाही. पण एक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानात उतरू शकतो. अशा पद्धतीने तो संघासोबत राहील आणि मेंटॉरप्रमाणे नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघ तयार करण्याचं काम करेल. अशी चर्चा सध्या क्रिकेट जगतात रंगली आहे.