
MS Dhoni CSK : मला जास्त धावायला लावायचं नाही... धोनीने संघ सहकाऱ्यांना केलीये सक्त ताकीद
MS Dhoni CSK : चिदंबरम स्टेडियमवर बुधवारी झालेल्या चेन्नई विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने 27 धावांनी विजय मिळवत आपले एक पाऊल प्ले ऑफमध्ये टाकले. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 197 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दिल्लीला 140 धावात रोखत सामना जिंकला. या सामन्यात चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 25 धाा केल्या. मात्र चेन्नईच्या विजयात मोठा वाटा हा महेंद्रसिंह धोनीने स्लॉग ऑव्हरमध्ये 9 चेंडूत ठोकलेल्या 20 धावांचा होता. धोनी आणि जडेजाने शेवटच्या तीन षटकात 39 धावा चोपत चेन्नईला फायटिंग टोटलजवळ पोहचवले.
दरम्यान, सामना झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने आपल्या या खेळीबद्दल सांगितले. तो म्हणाला की, 'हेच माझं काम आहे. मी माझ्या संघ सहकाऱ्यांना सांगून ठेवलं आहे की मी अशाच प्रकारची फलंदाजी करणार आहे. मला जास्त धावायला लावू नका, संघासाठी हे उपयुक्त ठरत आहे. मला हेच करणे गरजेचे होते. मी संघासाठी योगदान देतोय याचा मला आनंद आहे.'
धोनी पुढे म्हणाला की, 'स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्याकडे जसजसे आपण सरकत आहोत. प्रत्येकाला थोडी संधी मिळणे गरजेचे आहे. मी आमच्या फलंदाजीच्या कामगिरीवर खूष आहे. मला मिचेल सँटनरची गोलंदाजी आवडली. त्याने पाटा खेळपट्टीवर नवीन चेंडूवर चांगली गोलंदाजी केली. ऋतुराजही चांगली फलंदाजी करत आहे. तो असा फलंदाज आहे ज्यावेळी तो धावा करण्यास सुरूवात करतो त्यावेळी तो फार सहज धावा करतोय असे दिसते. तो स्ट्राईक देखील रोटेट करण्यास उत्सुक असतो. त्याच्याकडे सामन्यात काय चाललं आहे याचे चांगले ज्ञान असते. तो परिस्थितीशी जुळवून घेण्यास तयार असतो. तुम्हाला अशा खेळाडूंची गरज असते. जे खेळाडू गेम रीड करू शकतो. असे खेळाडू तुम्हाला तुमच्या संघात हवे असतात.'