Rohit Sharma IPL 2023: पराभवानंतर कर्णधार रोहित संघावर भडकला! कोणाच्या माथी फोडले खापर | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma IPL 2023

Rohit Sharma IPL 2023: पराभवानंतर कर्णधार रोहित संघावर भडकला! कोणाच्या माथी फोडले खापर

Rohit Sharma IPL 2023 : आयपीएलच्या क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्सने शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली असून आता ते दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत.

शुभमन गिलची आकर्षक शतकी खेळी आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या पाच विकेट्सच्या जोरावर गुजरात टायटन्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करत आयपीएल मधील सलग दुसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.

गुजरातच्या संघाचा रविवारी फायनलमध्ये चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना होईल, ज्याने चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांना 15 धावांनी पराभूत केले. दुस-या क्वालिफायर सामन्यात खराब पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्याच संघावर भडकला आहे.

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, हा एक चांगला योग होता, शुभमन गिलने खरोखरच चांगली फलंदाजी केली. खेळपट्टी खरोखरच चांगली होती. गुजरात टायटन्सने 25 धावा अतिरिक्त केल्या, आम्ही फलंदाजी केली तेव्हा आम्ही खूप सकारात्मक होतो. आम्हाला पुरेशी भागीदारी करता आली नाही. कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली, पण आमचा मार्ग चुकला.

रोहित पुढे म्हणाला, 'आम्ही पॉवरप्लेमध्ये काही विकेट गमावल्या आणि अशा लक्ष्याचा पाठलाग करताना आम्हाला गती मिळाली नाही. आम्हाला शेवटपर्यंत फलंदाजी करणारा शुबमन गिल सारखा फलंदाज हवा होता. आमची फलंदाजी ही सर्वात मोठी सकारात्मक ठरली आहे, खासकरून काही तरुण खेळाडू. या हंगामात संघांसमोर गोलंदाजी हे आव्हान होते, गेल्या सामन्यात जे काही घडले ते लक्षात घेता आमची कामगिरी उत्कृष्ट होती. शुभमनला श्रेय द्यायला हवे, तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि मला आशा आहे की तो पुढेही चालू ठेवेल.

शुबमन गिलने 60 चेंडूत 129 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि 10 षटकार मारले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने तीन विकेट्सच्या मोबदल्यात 233 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 18.2 षटकांत 171 धावांवर बाद झाला. त्याच्या संघातील केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. यामध्ये सूर्यकुमार यादवने 38 चेंडूत 61 तर टिळक वर्माने 14 चेंडूत 43 धावा केल्या.