Nehal Wadhera IPL 2023 : मुंबई इंडिनयन्सचा नेहाल वधेरा पॅड घालूनच पोहचला विमानतळावर; मज्जा नाही तर शिक्षा! | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nehal Wadhera Cricket Viral Video

Nehal Wadhera : मुंबई इंडिनयन्सचा नेहाल वधेरा पॅड घालूनच पोहचला विमानतळावर; मज्जा नाही तर शिक्षा!

Nehal Wadhera Cricket Viral Video : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या विसरभोळ्या स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू नेहाल वधेराचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना वाटेल की रोहित शर्माच्या विसरभोळ्या स्वभावाचा वारसा हा युवा खेळाडू तरी वाहतोय की काय?

त्याचं झालं असं की मुंबईचा युवा फलंदाज नेहाल वधेरा विमानतळावर फलंदाजीचे पॅड्स घालूनच अवतरला. सर्वांना वाटले की नेहाल पॅड काढायचाच विसरला की काय. मात्र यामागची कहानी काही वेगळीच आहे. नेहाल वधेरा पॅड काढायला विसरला नाही किंवा मज्जा म्हणून, रीलसाठी पॅड घालून विमान तळावर अवतरला नाही. त्याला संघ व्यवस्थापनाने शिक्षा केली होती.

मुंबई इंडियन्सने नेहाल वधेराचा हा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन दिले की, 'मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू नेहाल वधेरा त्याला दिलेल्या शिक्षेसहित मुंबई विमानतळावर अवतरला. तो विमानतळाबाहेर पॅड घालून जात असताना दिसला. आमच्या सूत्रांनुसार नेहाल फलंदाजांच्या मिटिंगला उशिरा पोहचल्याने त्याला ही शिक्षा मिळाली आहे.'

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 16 व्या हंगामातील आपले 12 सामने खेळले आहेत. त्यातील त्यांनी 7 सामन्यात विजय मिळवला असून 5 सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला. ते सध्या 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. मुंबईचे लीग स्टेजमधील अजून दोन सामने शिल्लक आहेत. ते आपला पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत 16 मे रोजी खेळणार आहेत. त्यानंतर ते 21 मे रोजी सनराईजर्स हैदराबादसोबत भिडणार आहेत. मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान पटकावण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.

(Sports Latest News)