
World Cup : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! पाकिस्तानचा धाकड खेळाडू विश्वचषकापूर्वी परतला फॉर्ममध्ये
World Cup 2023 : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तान संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा हा फॉर्म यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी चांगला संकेत आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा एक खेळाडू शानदार फॉर्ममध्ये परतला आहे. हा खेळाडू फॉर्मात आल्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत फखर जमान उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने सलग दोन सामन्यात दोन शतके झळकावून आपल्या संघासाठी दोन्ही सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 113 धावांची खेळी केली. त्याचवेळी शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 180 धावांची नाबाद खेळी केली.
आगामी वर्ल्ड कपमध्ये फखर जमान टीम इंडियासाठी टेन्शन बनू शकतो. 2017 मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फखर जमानच्या शतकाने टीम इंडियाकडून ती ट्रॉफी हिसकावून घेतली. अशा परिस्थितीत टीम इंडिया त्याचा फॉर्म हलका घेण्याची चूक करणार नाही. यंदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणे जवळपास निश्चित झाले आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 5 गडी गमावून 336 धावा केल्या. यादरम्यान डॅरिल मिशेलने 129 आणि टॉम लॅथमने 98 धावा केल्या. दुसऱ्या डावात पाकिस्तान संघासमोर 337 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी 48.2 षटकांत 3 गडी गमावून 337 धावा केल्या. यादरम्यान जमनने 180 धावांची सर्वोच्च नाबाद खेळी खेळली.