Punjab Kings vs Chennai Super Kings Marathi Update : २४ वर्षीय प्रियांश आर्याने ( Priyansh Arya) त्याच्या पहिल्याच आयपीएल स्पर्धेत शतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा समाचार घेताना त्याने ४२ चेंडूंत १०३ धावांची वादळी खेळी केली. पंजाब किंग्सचा निम्मा संघ ८५ धावांवर तंबूत परतला होता, परंतु प्रियांश उभा राहिला आणि त्याने भल्याभल्या गोलंदाजांना रडवले. यंदाच्या आयपीएलमधले हे दुसरे शतक ठरले. सनरायझर्स हैदराबादच्या इशान किशनने शतक झळकावले होते.