DC vs RR : प्रसिद्धच्या कष्टावर मॅकॉयने पाणी फिरवले होतेच, मात्र... | Prasidh Krishna maiden over Rajasthan Royals Defeat Delhi Capitals | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prasidh Krishna maiden over Rajasthan Royals Defeat Delhi Capitals

DC vs RR : प्रसिद्धच्या कष्टावर मॅकॉयने पाणी फिरवले होतेच, मात्र...

प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) दिल्ली विरूद्धच्या सामन्यात 19 व्या षटकात एका विकेटसह मेडन ओव्हर टाकरण्याचा कारनामा केला होता. त्याने ललित यादवला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे सामना 6 चेंडूत 35 धावा असा अवघड झाला होता. मात्र रोमनोव्ह पॉवेलने मॅकॉयच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारत सामन्यात रंग भरले. या रंगाचा बेरंग नो बॉलच्या वादाने झाला. अखेर कॉनवॉयने शेवटच्या तीन चेंडूत एका विकेटसह 2 धावा दिल्या. त्यामुळे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) सामना 15 धावांनी जिंकू शकले. राजस्थानने जॉस बटलरच्या (Jos Buttler) तडाखेबाज 116 धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) समोर 223 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र झुंजार दिल्ली 20 षटकात 8 बाद 207 धावांपर्यंतच मजल मारता आली.

हेही वाचा: माईक टायसनची विमानातच 'ठोसेबाजी'; पोलीस तपास सुरू

राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या 223 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी प्रसिद्ध कृष्णाने फोडली. त्याने वॉर्नरला 28 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेले सर्फराज खान देखील 1 धावेचे भर घालून आल्या पावली परतला.

पॉवर प्लेमध्ये आक्रमक फटके मारण्याऱ्या पृथ्वी शॉचा नंतर वेग मंदावला. दरम्यान 10 व्या षटकात अश्विनने 27 चेंडूत 37 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत दिल्लीला मोठा धक्का दिला. पृथ्वी शॉ बाद झाला त्यावेळी दिल्लीने 99 धावांपर्यंत मजल मारली होती.

पृथ्वी बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र प्रसिद्ध कृष्णाने त्याची 24 चेंडूतील 44 धावांची खेळी 12 व्या षटकात संपवली. पाठोपाठ युझवेंद्र चहलने अक्षर पटेलचा (1) त्रिफळा उडवत दिल्लीचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.

यानंतर शार्दुलही 10 धावांची भर घालून परतला. दरम्यान, ललित यादवने 24 चेंडूत 37 धावा चोपत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र त्याला प्रसिद्धने 19 व्या षटकात बाद करत राजस्थानला दिलासा दिला. प्रसिद्ध कृष्णाने 19 वे षटक निर्धाव टाकत दिल्लीपासून सामना दूर नेला होता. मात्र शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 35 धावांची गरज असताना पॉवेलने पहिल्या तीन चेंडूत तीन षटकार मारत राजस्थानचे टेन्शन वाढवले. मात्र अखेर मॅकॉयने शेवटच्या षटकात 20 धावा देत सामना जिंकून दिला.

हेही वाचा: Jos Buttler | सामने सात शतके तीन; बटलर बॅटिंग करतोय की चेष्टा

आयपीएलच्या 34 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या दिल्लीच्या गोलंदाजांची सलामीवीर जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कलने चांगलीच धुलाई केली. पॉवर प्लेमध्ये 44 धावा करत राजस्थानला आश्वासक सुरूवात करून दिली.

जॉस बटलरने आपला गिअर बदलत अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर बटलरने आपली आक्रमणाची धार अजून वाढवली. दरम्यान, बटलर आणि दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणाऱ्या देवदत्त पडिक्कलने राजस्थानला शतकी मजल मारून दिली. पडिक्कलनेही अर्धशतकी मजल मराली. विशेष म्हणजे या दोघे शतकी सलामीवीरच थांबले नाहीत. त्यांनी राजस्थानला 15 व्या षटकात दीडशतकी मजल मारून दिली.

त्यानंतर खलील अहमदने दिल्लीला पहिले यश मिळून दिले. त्याने 35 चेंडूत 54 धावांची खेळी करणाऱ्या पडिक्कला बाद केले. दरम्यान, बटलरने आपले हंगामातील तिसरे शतक ठोकले आणि राजस्थानला 200 चा टप्पा पार करून दिला. दुसऱ्या बाजूने संजू सॅमसन देखील दणके देत होता. त्यानंतर मुस्तफिजूरने बटलरची 65 चेंडूत 116 धावांची खेळी संपवली. मात्र सॅमसनने 19 चेंडूत केलेल्या 46 धावांमुळे राजस्थानने 20 षटकात 2 बाद 222 धावांपर्यंत मजल मराली. राजस्थानची आयपीएलमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

Web Title: Prasidh Krishna Maiden Over Rajasthan Royals Defeat Delhi Capitals By 15 Runs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..