PBKS vs DC : रोमहर्षक सामन्यात दिल्लीने दिला पंजाबला पराभवाचा धक्का | IPL 2023 | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab Kings vs Delhi

PBKS vs DC : रोमहर्षक सामन्यात दिल्लीने दिला पंजाबला पराभवाचा धक्का

Punjab Kings vs Delhi Capitals : पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. मात्र अखेरीस दिल्लीने हा सामना 15 धावांनी जिंकला. याचबरोबर पंजाब किंग्जची प्ले ऑफ गाठण्याची शेवटची आशा देखील मावळली. दिल्ली यापूर्वीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. मात्र त्यांनी आजच्या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेचा तळ सोडला. पंजाबचे आता 13 सामन्यात 12 गुण झाले आहेत. त्यांनी पुढचा सामना जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतील.

दिल्लीने पंजाबसमोर विजयासाठी 214 धावांचे आव्हान ठेवले होते. पंजाब किंग्जकडून लिम लिव्हिंगस्टोनने 48 चेंडूत 94 धावा चोपत संघाला विजय मिळवून देण्याचा अटोकाट प्रयत्न केला. अखेरच्या षटकात 33 धावांची गरज होती. मात्र पंजाबला 17 धावाच करता आल्या. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि नॉर्त्जेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. पंजाबच्या अथर्व तायडेनेही 55 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली झुंज दिली.

पृथ्वीचे अर्धशतक तर रूसोचे तडाखे

वॉर्नर बाद झाल्यानंतर आलेल्या रिली रूसोने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सलामीवीर पृथ्वी शॉने आपले हंगामातील अर्धशतक पूर्ण केले. मात्र सॅम करनने त्याला धावांवर बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. या धक्क्याचा दिल्लीच्या रूसोवर काही परिणाम झाला नाही. त्याने आपला दांडपट्टा सुरूच ठेवत 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. हे त्याचे हंगामातील पहिले अर्धशतक ठरले. यानंतरही रूसो थांबला नाही त्याने 37 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत दिल्लीला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. त्याला सॉल्टने 14 चेंडूत 26 धावा करून चांगली साथ दिली.

डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक हुकले. 

पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात करून दिल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी आपला धडाका कायम ठेवत दिल्लीला 10 षटकात 93 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान दोघेही आपल्या अर्धशतकाजवळ पोहचले होते. मात्र सॅम करनने डेव्हिड वॉर्नरला 46 धावांवर बाद केले.

दिल्लीची दमदार सुरूवात

पंजाबने दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर दिल्लीच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला 6 षटकात 61 धावांपर्यंत पोहचवले. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली.

पंजाबने नाणेफेक जिंकली

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.