PBKS vs RR : राजस्थानचा शेवटच्या षटकात निसटता विजय, शेवट केला गोड

Punjab Kings vs Rajasthan Royals
Punjab Kings vs Rajasthan Royals esakal

Punjab Kings vs Rajasthan Royals : पंजाब किंग्जने विजयासाठी ठेवलेल्या 188 धावा राजस्थान रॉयल्सने 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 20 व्या षटकात पार केले. राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जैसवाल (50) आणि देवदत्त पडिक्कलने (51) अर्धशतकी खेळी केली. यानंतर शिमरोन हेटमायरने 28 चेंडूत 46 धावांची खेळी केली मात्र विजयासाठी 9 धावांची गरज असताना तो बाद झाला. अखेर जुरेल आणि ट्रेंट बोल्टने शेवटच्या षटकात 9 धावा करत राजस्थानच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पंजाबकडून कगिसो रबाडाने 40 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

आयपीएलच्या 66 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने सुरूवात खराब करूनही 188 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबच्या शाहरूख खानने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत 23 चेंडूत नाबाद 41 धावा ठोकल्या. त्याला सॅम करनने 49 धावा करून चांगली साथ दिली. जितेश शर्मानेही 28 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून नवदीप सैनीने 40 धावात 3 विकेट्स घेतल्या.

सॅम - शाहरूखची फटकेबाजी

जितेश शर्मा बाद झाला त्यावेळी डावातील 14 षटके झाली होती. त्यानंतर आलेल्या शाहरूख खान आणि सॅम करन यांनी सहाव्या विकेटसाठी पुढच्या 6 षटकात 73 धावांची नाबाद भागीदारी रचली. यामुळे पंजाबने 20 षटकात 5 बाद 187 धावांपर्यंत मजल मारली. सॅम करनने नाबाद 49 तर शाहरूख खानने 23 चेंडूत नाबाद 44 धावा चोपल्या.

सॅम करन जितेश शर्माने सावरला डाव

पंजाबचे चार फलंदाज 50 धावा करतानाच गारद झाल्यानंतर सॅम करन आणि जितेश शर्माने पंजाबचा डाव सावरत पंजाबला 10 षटकात 78 धावांपर्यंत मजल मारून दिली. जितेश शर्माने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडूत 44 धावा चोपल्या. त्याने करनसोबत 44 चेंडूत 64 धावांची भागीदारी रचली. पंजाबनेही शतकी मजल मारली होती. मात्र 14 व्या षटकात सैनीने जितेश शर्माचा अडसर दूर केला.

पॉवर प्ले पंजाबसाठी कभी खुशी कभी गम 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला पहिल्याच षटकात ट्रेंड बोल्टने धक्का दिला. त्याने सलामीवीर प्रभसिमरन सिंगला 2 धावांवर बाद केले. यानंतर शिखर धवन आणि अथर्व तायडेने डाव सावरत चौथ्या षटकात संघाला 38 धावांपर्यंत पोहचवले. मात्र नवदीप सैनीने अथर्वला 19 धावांवर तर झाम्पाने शिखर धवनला 17 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ सैनीने लिम लिव्हिंगस्टोनचा 9 धावांवर त्रिफळा उडवत पंजाबची अवस्था 6.3 षटकात 4 बाद 50 अशी केली.

राजस्थानने नाणेफेक जिंकली

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com