Gautam Gambhir Rahul Sharma : थँक यू सासूबाई बऱ्या झाल्या.... राहुल शर्माने गौतम गंभीरचे मानले आभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Gambhir Rahul Sharma

Gautam Gambhir Rahul Sharma : थँक यू सासूबाई बऱ्या झाल्या.... राहुल शर्माने गौतम गंभीरचे मानले आभार

Gautam Gambhir Rahul Sharma : विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोन भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडूंमधील वाद नुकताच चर्चेत आला होता. त्यानंतर या दोघांवरही सोशल मीडियावर टीका आणि दोघांचे समर्थन करणाऱ्यांची झुंबड उडाली होती. याच दरम्यान, भारताचा माजी खेळाडू राहुल शर्माने ट्विटवर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले. राहुल शर्माने ट्विटरवर गौतम गंभीरचे आभार मानले. गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी राहुल शर्माच्या सासूबाईंच्या उपचारासाठी मदत केली होती. त्याबद्दल राहुलने आभार मानले होते.

राहुल शर्माने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली. यात त्याने गौतम गंभीरचे वेळीच मदत केल्याबद्दल आभार मानले. शर्मा म्हणाला की, गौतम गंभीरने माझ्या सासूबाईंच्या उपचारासाठी वेळेत चांगला डॉक्टर आणि रूग्णालय शोधण्यात मदत केली. ही घटना गेल्या महिन्यात घडली होती. राहुल पुढे म्हणाला की, त्यांच्या सासूबाईंची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता त्या ठणठणीत आहेत.

राहुल शर्मा हा भारताकडून 2011 ते 2012 च्या दरम्यान खेळला होता. त्याने 4 वनडे आणि 2 टी 20 सामने खेळले आहेत. राहुलने ही सोशल मीडिया पोस्ट गंभीर आणि विराट कोहलीचा वाद झाल्यानंतर काही दिवसातच केली आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहली आरसीबी आणि लखनौच्या सामन्यानंतर एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोघांमध्ये चांगलेच शाब्दिक द्वंद्व रंगले.

(Sports Latest News)