Jos Buttler | सामने सात शतके तीन; बटलर बॅटिंग करतोय की चेष्टा

Rajasthan Royals Jos Buttler 3rd Century In ipl 2022
Rajasthan Royals Jos Buttler 3rd Century In ipl 2022 ESAKAL

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) धडाकेबाज सलामीवीर जॉस बटलर (Jos Buttler) आयपीएलच्या 15 व्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या सहा सामन्यात दोन शतकी खेळी करणाऱ्या बटलरने दिल्ली विरूद्ध खेळल्या जात असलेल्या सातव्या सामन्यात देखील शतक ठोकून कमाल केली. (Jos Buttler 3rd Century) वानखेडेच्या बॅटिंग विकेटचा चांगलाच फायदा उचलत जॉस बटलरने 57 चेंडूत शतकी खेळी केली. बटलर आता विराट कोहलीनंतर (Virat Kohli) एका आयपीएल हंगामात सर्वाधिक शतक ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने 2016 च्या हंगामात 4 शतकी खेळी केल्या होत्या.

Rajasthan Royals Jos Buttler 3rd Century In ipl 2022
मुंबईच्या मेंटॉरचा सल्ला; टी 20 'क्रूर' खेळ, महत्वाच्या क्षणांवर हवे नियंत्रण

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) वानखेडेवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानची फेमस सलामी जोडी देवदत्त पडिक्कल आणि जॉस बटलर ही क्रीजवर आली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाज करत आधी जम बसवला. यानंतर जॉस बटलरने आपला गिअर बदलत अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर बटलरने आपली आक्रमणाची धार अजून वाढवली. दरम्यान, बटलर आणि दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणाऱ्या देवदत्त पडिक्कलने राजस्थानला शतकी मजल मारून दिली. पडिक्कलनेही अर्धशतकी मजल मराली.

Rajasthan Royals Jos Buttler 3rd Century In ipl 2022
माझा देश ग्रेट होऊ शकतो, पण....; इरफानच्या ट्विटवर मिश्राचा पलटवार?

यानंतर जॉस बटलरने फटकेबाजी करत शतक ठोकले. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील हे तिसरे शतक आहे. विशेष म्हणजे राजस्थानच्या आता कुठे साखळी फेरीतील निम्मे सामने झाले आहेत. त्यातच बटलरने तिसरे शतक ठोकले. बटलरने सात सामन्यात आताच 450 च्या वर धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी मुसंडी मारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com