Shane Warne : राजस्थानने आपल्या 'पहिल्या रॉयल'ला वाहिली खास श्रद्धांजली

Rajasthan Royals Pay Tribute to First Royal Shane Warne
Rajasthan Royals Pay Tribute to First Royal Shane Warne ESAKAL

दिवंगत लेगस्पिनर शेन वॉर्नला (Shane Warne) एमसीजी मैदानावर बुधवारी जगभरातील क्रिकेट खेळाडूंनी श्रद्धांजली (Tribute) वाहिली. शेन वॉर्न ज्या आयपीएल फ्रेंचायजीकडून पहिल्यांदा खेळला आणि त्याचे नेतृत्व करत पहिल्या वहिल्या आयपीएल टायटलवर नाव कोरले त्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) देखील शेन वर्नला एक खास व्हिडिओद्वारे श्रद्धांजली वाहिली.

Rajasthan Royals Pay Tribute to First Royal Shane Warne
सचिन तेंडुलकरने सांगितली शेन वॉर्नसोबतची शेवटची आठवण

शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना 2008 च्या पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते. राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नचा पहिला रॉयल संबोधत त्याला श्रद्धांजली वाहिली. राजस्थानने यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात शेन वॉर्नच्या आठवणींना उजाळा दिला. याबाबतचा व्हिडिओ राजस्थानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

Rajasthan Royals Pay Tribute to First Royal Shane Warne
मेलबर्नवरील श्रंद्धाजली कार्यक्रम; शेन वॉर्नच्या आठवणीत लेक ढसाढसा रडली!

शेन वॉर्नचा 4 मार्चला थायलंडमधील व्हिलामध्ये मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू ह्रदय विकाराच्या झटक्यामुळे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सकडून 2008 ते 2012 पर्यंत 55 आयपीएल सामने खेळले होते. तर त्याने ऑस्ट्रेलियाकडून 145 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले. त्यात त्याने 708 विकेट्स घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com