VIDEO : राजस्थानच्या विमानत धुकं, काळोख; खेळाडूंचा घाबरून थरकाप

Rajasthan Royals Plane Hit By Strom
Rajasthan Royals Plane Hit By Strom ESAKAL

कोलकाता : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील क्वालिकफायरमध्ये (IPL 2022 Qualifier) जाणारे संघ आता निश्चित झाले आहे. पहिला क्वलिफायर सामना हा गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होत आहे. आयपीएलचे क्वालिफायर आणि एलिमनेटरचे सामने हे कोलकात्यात होणार आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ मुंबईतून कोलकात्याला जात होता. मात्र राजस्थान रॉयल्सचा संघ बसलेले विमान (Plane) वादळाच्या (Strom) तडाख्यात सापडले. विमानात बसलेले राजस्थानचे खेळाडू विमानात अनपेक्षित होणाऱ्या भयानक बदलांमुळे घाबरून गेले होते. राजस्थानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विमानातील भयावह स्थितीचा व्हिडिओ शेअर केला.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना हा 24 मे रोजी कोलकात्यात होणार आहे. मात्र कोलकात्यात पोहचेपर्यंत राजस्थानची परिस्थिती बिकट बनली होती. कोलकात्याला सध्या वादळाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजस्थान आणि गुजरातमध्ये 24 मे रोजी होणाऱ्या सामन्यावर देखील वादळाचे सावट आहेत. सामन्यावेळी पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. जर हा सामना वॉश आऊट झाला तर गुजरात गुणतालिकेच्या आधारावर फायनलमध्ये प्रवेश करेल. तर राजस्थानला नाईलाजास्तव दुसरी क्वालिफाय खेळावी लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com