
IPL 2022 : बेबी एबीनंतर आता IPL मध्ये 'बेबी गांगुली'ची चर्चा
IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 2022 पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) सामना राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन (Eden Garden ) मैदानावर दोन्ही संघांमध्ये ही टक्कर होणार असून, सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे, तर पराभूत संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी मैदानात बेबी गांगुलीचीही एन्ट्री झाली असून, राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. (Rajasthan Royals Yashasvi Jaiswal Video )
राजस्थानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा फलंदाज यशस्वी जैस्वालची (Yashasvi Jaiswal) तुलना सौरव गांगुलीशी (Sourav Ganguly) करण्यात आली आहे. यामध्ये आरआरने लिहिले आहे की, 'बेबी गांगुली ईडन गार्डनवर पूर्ण फ्लोमध्ये आहे'. दरम्यान, यशस्वी जैस्वालच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत असून, काहींनी जैस्वालची फलंदाजीची शैली सौरव गांगुलीसारखीच असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी जयस्वालने सौरव गांगुली किंवा सचिन तेंडुलकर जे पॅड घालायचे त्याच प्रकारचे पॅड घातले असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
हेही वाचा: IPL 2022 : दहा कोटींची बोली लागलेल्या खेळाडूंची कशी झाली कामगिरी?
यशस्वी जैस्वालने गेल्या चार सामन्यांमध्ये तीन वेळा 40 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने आयपीएल 2022 मध्ये खेळलेल्या सात सामन्यांमध्ये 30.29 च्या सरासरीने आणि 135.03 च्या स्ट्राइक रेटने 212 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली.
Web Title: Rajasthan Royals Share Yashasvi Jaiswal Video In Sourav Ganguly Style
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..