
RR vs LSG IPL 2023 : लखनौने 155 धावा केल्या डिफेंड, राजस्थानचा सलग तीन विजयानंतर झाला पराभव
RR vs LSG LIVE IPL 2023 : राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात लखनौने 155 धावांचे माफक आव्हान देखील डिफेंड कर राजस्थानला 10 धावांनी मात दिली. राजस्थानला 20 षटकात 6 बाद 144 धावाच करता आल्या. राजस्थानने चांगली सुरूवात करून देखील त्यांच्या मधल्या टप्प्यात विकेट पडल्याने धावगती मंदावली. लखनौकडून आवेश खानने 3 तर स्टॉयनिसने 2 विकेट्स घेतल्या. राजस्थानकडून यशस्वी जैसवालने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर बटलरने 40 धावांची खेळी केली मात्र त्याला यासाठी 41 चेंडू खेळावे लागले.
तत्पर्वी, केएल राहुल - मेयर्स या सलामी जोडीने 82 धावांची सलामी दिल्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत लखनौला 155 धावांपर्यंत रोखले. मेयर्सने 51 तर राहुलने 39 धावांचे खेळी केली. मात्र त्यानंतर अश्विन, बोल्ट, होल्डर संदीप शर्मा यांनी चांगला मारा करत लखनौला 20 षटकात 6 बाद 154 धावात रोखले.
लखनौने राजस्थानल दिली मात
राजस्थानच्या पाठोपाठ विकेट पडल्याने त्यांची धावगती मंदावली. अखेर सामना शेवटच्या षटकात 19 धावा असा आला होता. आवेश खानच्या या षटकात पहिल्याच चेंडूवर रियान परागने चौकार लगावत आशा निर्माण केली होती. मात्र यानंतर आवेशने 8 धावा देत 2 विकेट्स घेत लखनौला सामना 10 धावांनी जिंकून दिला.
97-3 : राजस्थानची अवस्था खराब
चांगल्या सुरूवातीनंतर मात्र राजस्थानची धावगती मंदावण्या सुरूवात झाली. आधी यशस्वी जैसवाल 35 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनला फक्त 2 धावांची भर घालता आली. दरम्यान, स्टॉयनिसने बटलरला 40 धावांवर बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला.
60-0 (8 Ov) : राजस्थानची दमदार सुरूवात
लखनौ सुपर जायंट्सने ठेवलेल्या 155 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामी जोडीने दमदार सलामी दिली. यशस्वी जैसवाल आणि जॉस बटलर यांनी पहिल्या 8 षटकात 60 धावा केल्या.
लखनौची गाडी 154 धावांवर अडली
अर्धशतक ठोकणारा मेयर्स बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी 5 व्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचत संघाला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र 20 वे षटक टाकणाऱ्या संदीप शर्माने स्टॉयनिसला 21 धावांवर बाद केले. पाठोपाठ निकोलस पूरन देखील 20 चेंडूत 28 धावा करत तर कृणाल यदुवीर 1 धाव करून धावबाद झाला.
104-4 (13.5 Ov) : दमदार सलामीनंतर लखनौला लागली गळती
पॉवर प्लेमध्ये संथ सुरूवात करणाऱ्या केएल राहुल आणि कायल मेयर्स यांनी नंतर आक्रमक फटकेबाजी करत धावांची गती वाढवण्यास सुरूवात केली. ही जोडी आज शतकी सलामी देणार असे वाटत असतानाच होल्डरने राहुलला 39 धावांवर बाद केले. त्यानंतर आयुष बदोनीला बोल्टने 1 तर दीपक हुड्डला अश्विनने 2 धावांवर बाद करत लखनौची अवस्था बिनबाद 82 वरून 3 बाद 99 अशी केली. अखेर अर्धशतक ठोकणाऱ्या मेयर्सने लखनौला शंभरी पार करून दिली. मात्र अश्विनने मेयर्सचा 51 धावांवर त्रिफळा उडवत लखनौचा सेट फलंदाज माघारी धाडला.
पॉवर प्लेमध्ये लखनौची सावध सुरूवात
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचे सलामीवीर केएल राहुल आणि कायल मेयर्स यांना पॉवर प्लेमध्ये आक्रमक फटकेबाजी करण्यापासून रोखले. लखनौला पहिल्या 5 षटकात 31 धावांपर्यंतच मजल मारता आली.
राजस्थानने नाणेफेक जिंकली
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.