
RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत झाला मोठा गेम, मैदानात उतरण्याआधीच प्रवास संपणार?
IPL 2023 RCB Chances Of Playoffs Qualification : आयपीएल 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. गतविजेता गुजरात गुणतालिकेत अव्वल आहे आणि त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाबतीत असे नाही. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला हा सामना जिंकावा लागेल. सामना न जिंकताही संघाला पुढील फेरी गाठता येईल, मात्र त्यासाठी इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या अनेक भागात शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. 30-40 किमी वेगाने वारे वाहत आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमवरही पाऊस झाला. त्यामुळे खेळाडू उशिराने नेट प्रॅक्टिसला उतरले. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार पुढील पाच दिवस शहरात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
AccuWeather नुसार, पावसामुळे खेळात व्यत्यय येऊ शकतो. दुपारी एक वाजल्यापासून दिवसभर पाऊस आणि सरी पडण्याची शक्यता आहे. सामन्याच्या वेळेत पावसाची 50% पेक्षा जास्त शक्यता आहे. रात्री 8 नंतर पावसाची 70 टक्के शक्यता आहे. एम चिन्नास्वामी मैदानावरील ड्रेनेज व्यवस्था उत्तम असली तरी. सँड बेस आउटफिल्डमुळे पाऊस संपल्यानंतर काही वेळात सामना सुरू होऊ शकतो.
पावसामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा अंतिम सामना झाला नाही, तर त्यांना फक्त एक गुण मिळेल. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला हरवले तर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचता येणार नाही. मात्र जर मुंबई हरली, तर सामना रद्द झाल्यानंतर किंवा अनिर्णित राहिल्यानंतरही आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल.