
Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतने काठी दिली फेकून, Video होतोय व्हायरल
Rishabh Pant Health Update : आयपीएलचा 16 वा हंगाम जसजसा त्याच्या शेवटाकडे कूच करत आहे तसतसे भारतीय क्रिकेट चाहत्यांना 7 जूनपासून सुरू होणाऱ्या WTC Final चे वेध लागले आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. टीम इंडिया यावेळी त्याचा हुकमी एक्का ऋषभ पंतविनाच ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे.
सर्वांनाच ऋषभ पंत दुखापतीतून सावरून कधी एकदा क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परततो याचे वेध लागले आहेत. दरम्यान, ऋषभ पंतने आज आपल्या सर्व चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. त्याने सहाय्यासाठी वापरत असलेली काठी फेकून दिली आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ऋषभ पंत सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत रिहॅबिलिटेशन करत आहे. 30 डिसेंबरला कार अपघातात त्याच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली होती. त्याचे तीन लिगामेंट टिअर झाले होते. त्याच्या गुडघ्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र चार महिने झाले तरी त्याच्या हातून सहाऱ्याची काठी सुटली नव्हती. अखेर एनसीएमध्ये ही काठी त्याने फेकून दिली. यापूर्वी तो टेबल टेनिस खेळतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. ऋषभ पंतने आता आपल्या दुखापतीवर मात करण्याच्या बाबतीत वेग घेतला आहे.
हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार