Rishabh Pant Instagram Story : ऋषभ पंतच्या फिटनेसचं प्रगतीपुस्तक; इन्स्टा स्टोरी ठेवत म्हणतो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant Instagram Story

Rishabh Pant Instagram Story : ऋषभ पंतच्या फिटनेसचं प्रगतीपुस्तक; इन्स्टा स्टोरी ठेवत म्हणतो...

Rishabh Pant Instagram Story : भारताचा डॅशिंग यष्टीरक्षक ऋषभ पंतला कार अपघातात अनेक दुखापती झाल्या होत्या. त्याच्या गुडघ्याच्या तीन लिगामेंटवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पंत काठीच्या सहाय्याने चालत होता. या दुखापतीतून पंत कधी सावरणार याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये आणि बीसीसीआयला देखील उत्सुकता आहे. दरम्यान, ऋषभ पंतने आज इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत आपल्या फिटनेसबाबत अपडेट दिली.

ऋषभ पंतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जीममधील एक फोटो शेअर केला आहे. याचबरोबर तो जीमधील एका भिंतीवर लिहिलेल्या एका कोटकडे देखील सर्वांचे लक्ष वेधत आहे. 'खेळ हा व्यक्तीमत्व घडवत नाही तर तो ते सर्वांसमोर आणतो.' असा तो कोट आहे.

ऋषभ पंत हा कार अपघातात दुखापतग्रस्त होण्यापूर्वी भारताचा तीनही फॉरमॅटमधील एक महत्वाचा खेळाडू होता. मात्र या दुखापतीमुळे त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे. हा सामना 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल येथे सुरू होणार आहे. पंत WTC Final पाठोपाठ आशिया कप आणि भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपला देखील मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार