
IPL 2023: एलिमिनेटरमध्ये गौतम गंभीर अन् विराट कोहली पुन्हा आमनेसामने! जाणून घ्या कसे काय
IPL 2023 Eliminator : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा मोठ्या फरकाने पराभव करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. याशिवाय फाफ डू प्लेसिसच्या संघाने निव्वळ धावगती सुधारली आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे.
खरंतर, क्रिकेट चाहत्यांना गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील सामना पाहायचा आहे, पण ते शक्य आहे का? चाहत्यांना एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना पाहता येईल का?
आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 12 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 6 सामने जिंकले आहेत, तर 6 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 12 सामन्यांत 12 गुण आहेत. हा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.
तर लखनौ सुपर जायंट्स 13 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचे आगामी दोन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले तर ते 16 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात.
त्याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. जर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरले, तर चाहत्यांना दोन्ही संघांमधील एलिमिनेटर पाहता येईल.
मात्र, यासाठी इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने एक ट्विट केले. या ट्विटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी सतत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना पाहायचा आहे. मात्र प्लेऑफमध्ये पोहोचणारे टॉप-4 संघ कोणते?