DC vs RCB : आरसीबी दिल्ली सर करून पोहचली 'टॉप थ्री'मध्ये

IPL 2022 Royal Challengers Bangalore Defeat Delhi Capitals
IPL 2022 Royal Challengers Bangalore Defeat Delhi CapitalsESAKAL

मुंबई : रॉयल चॅलेंजरने (Royal Challengers Bangalore) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 16 धावांनी पराभव करत गुणतालिकेत मोठी उडी मारली. बेंगलोरने 8 गुण मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. बेंगलोरकडून हेजलवूडने 3 तर मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या. बॅटिंगमध्ये दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 66 धावांची तर ग्लेन मॅक्सवेलने 55 धावांची खेळी केली. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने (David Warner) दमदार 66 धावांची खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी आरसीबीने दिल्लीला धक्के देत सामन्यावर नियंत्रण मिळवले.

IPL 2022 Royal Challengers Bangalore Defeat Delhi Capitals
IPL ला मुकलेल्या दीपक चाहरची BCCI च्या एका निर्णयाने होणार चांदी

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या 190 धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजी करत दिल्ली कॅपिटल्सला शतकाच्या जवळ पोहचवले. मात्र 34 चेंडूत 66 धावांची खेळी करणारा वॉर्नर बाद झाल्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली.

मिशेल मार्श 14 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर हेजवूडने पॉवेल आणि ललित यादवला पाठोपाठच्या चेंडूवर बाद करून दिल्लीची अवस्था 5 बाद 115 धावा अशी केली. मात्र त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. त्याने 17 चेंडूत 34 धावा केल्या. मात्र मोक्याच्या क्षणी मोहम्मद सिराजने पंतला बाद करत आरसीबीला मोठा दिलासा दिला.

IPL 2022 Royal Challengers Bangalore Defeat Delhi Capitals
राहुल 'खास' क्लबमध्ये झाला सामील; विराट 'विक्रम' मात्र अजून दूरच

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 27 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरची सुरूवात खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर 13 धावात पॅव्हेलियनमध्ये गेले. त्यानंतर विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 12 धावांवर बाद झाला.

विराट माघारी गेल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी करत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने 34 चेंडूत 55 धावांची खेळी केली. मात्र कुलदीप यादवने ही खेळी संपलवी. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमदने जोरदार फटकेबाजी केली. दिनेश कार्तिकने 34 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. तर शाहबाजने 21 चेंडूत 32 धावांची खेळी करून त्याला चांगली साथ दिली. या दोघांच्या 97 धावांच्या भागीदारीमुळे आरसीबीने 189 धावांपर्यंत मजल मारली.

दिल्लीकडून शार्दुल ठाकूर, खलील अहमद, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com