Sai Sudharsan : सहा षटकार अन् आठ चौकार! धोनीच्या गोलंदाजांची साईकडून धुलाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Sudharsan : सहा षटकार अन् आठ चौकार! धोनीच्या गोलंदाजांची साईकडून धुलाई

Sai Sudharsan : सहा षटकार अन् आठ चौकार! धोनीच्या गोलंदाजांची साईकडून धुलाई

Chennai Super Kings vs Gujarat Titans IPL 2023 Final : आयपीएल 2023 च्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 215 धावांचे आव्हान ठेवले. गुजरातकडून साई सुदर्शनने 47 चेंडूत 96 धावांची धडाकेबाज खेळी केली. सुदर्शन सोबतच वृद्धीमान साहाने देखील 54 धावांचे योगदान दिले. त्याने 204.26 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. हार्दिकने 12 चेंडूत 21 तर गिलने 20 चेंडूत 39 धावा ठोकल्या. चेन्नईकडून पथिरानाने 2 विकेट्स घेतल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईने पहिल्या दोन षटकात गुजरातच्या सलामीवीरांना मोठे फटके मारण्यापासून रोखले होते. मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकात वृद्धीमान साहाने 16 धावा चोपत आपली धावगती वाढवली. त्यात शुभमन गिलला चाहरने जीवनदान दिले. यानंतर वृद्धीमान आणि गिलने पॉवर प्लेमध्ये 62 धावा केल्या.

पॉवर प्लेमध्ये जीवनदान मिळाल्यानंतर गिलने धडाकेबाज फलंदाजी करण्यास सुरूवात केली होती. त्याने पॉवर प्लेमध्ये 17 चेंडूत 36 धावा ठोकत संघाला 62 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र रविंद्र जडेजाने पॉवर प्ले झाल्यानंतर शुभमन गिलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात पकडले. त्याने गिलला 39 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

गिल बाद झाल्यानंतर वृद्धीमान साहाने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत गुजरातला 12 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. त्याने अर्धशतकी मजल मारली. त्याला साई सुदर्शनने देखील चांगली साथ देत होता.

वृद्धीमान साहाने 54 धावांची अर्धशतकी खेळी करत साई सुदर्शनला साथीला घेत दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचली. अखेर ही भागीदारी दीपक चाहरने फोडली. त्याने अर्धशथकवीर साहा बाद केले.

वृद्धीमान साहा बाद झाल्यानंतर साई सुदर्शनने तडाखेबाज फलंदाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना बेजार केले. त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. त्याने 17 वे षटक टाकणाऱ्या तुषार देशपांडेच्या षटकात तीन चौकार आणि एक षटकार मारत 20 धावा वसूल केल्या.

शेवटच्या षटकात साई सुदर्शनने सलग दोन षटकार मारत शतकाजवळ पोहचला. मात्र पथिरानाने त्याला 96 धावांवर पायचित बाद केले. त्याचे अवघ्या 4 धावांनी शतक हुकले. अखेर गुजरातने 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या.

टॅग्स :IPL