
Shaheen Afridi : 6, 6, 6, 6 गोलंदाज शाहीन आफ्रिदीची फलंदाजाला लाजवेल अशी कामगिरी Video व्हायरल
Shaheen Afridi Sixes : पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज हा आपल्या प्रभावी माऱ्याने जगभरातील फलंदाजांची भंबेरी उडवून देतो. मात्र सध्या याच शाहीनचा एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही अवाक व्हाल. शाहीन आफ्रिदीचा हा व्हिडिओ पाहून तो गोलंदाज आहे की फलंदाज असा प्रश्न पडेल. तो सध्या आपल्या फलंदाजीवर काम करत असून त्याचे फळ दिसून येत आहे.

शाहीन आफ्रिदी सध्या इंग्लंडमध्ये टी 20 ब्लास्ट स्पर्धा खेळथ आहे. तो नॉटिंघमशायरकडून खेळतोय. आज त्याच्या संघाची लढत वॉर्केस्टरशायरशी झाली. या सामन्यात 16 व्या षटकात डावखुऱ्या शाहीन आफ्रिदीने चार षटकार मारत धमाका केला. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर शाहीनने हा कारनामा केला. ब्रेसवेलने आरीसीबकडून 2023 च्या हंगामात चांगली गोलंदाजी केली होती.
मात्र शाहीनने याच ब्रेसवेलच्या पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार मारले. शाहीनने नॉटिंगहमशायरसाठी दुसरी सर्वात मोठी खेळी केली. आफ्रिदीने 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 11 चेंडूत 29 धावा ठोकल्या.
शाहीन आफ्रिदीने फलंदाजी जरी धमाका केला असला तरी नॉटिंगहमशायरला सामना जिंकण्यात मात्र अपयश आले. त्यांचा 56 धावांनी मोठा पराभव झाला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या वॉर्केस्टरशायरने 5 विकेट्स गमावून 226 धावा केल्या. यात ब्रेसवेलने सलामीला येत 27 चेंडूत 55 धावांची खेळी केली. हॉसने 27 चेंडूत 51 धावा केल्या. नॉटिंघमशायरकडून एलेक्स हेल्सने 35 चेंडूत 71 धावांची दमदार खेळी केली. मात्र ही खेळी त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.