Shubman Gill : मॅच संपली अन् सचिन गिलच्या कानात गुपचूप काय म्हणाला...? सोशल मीडियावर खळबळ | Shubman Gill and Sachin Tendulkar | Social Media | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubman Gill and Sachin Tendulkar

Shubman Gill : मॅच संपली अन् सचिन गिलच्या कानात गुपचूप काय म्हणाला...? सोशल मीडियावर खळबळ

Shubman Gill and Sachin Tendulkar : मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या क्वालिफायर-2 सामन्यात भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने आपल्या बॅटने कहर केला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-2 सामन्यात शुभमन गिलने 60 चेंडूत 129 धावांची वादळी खेळी खेळली. शुभमन गिलने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकार मारले.

या शतकासह शुभमन गिलने आयपीएल 2023 मध्ये एकूण 3 शतके पूर्ण केली आहेत. शुभमन गिलने या आयपीएल हंगामात सर्वाधिक 851 धावा केल्या आहेत आणि त्याच्याकडे ऑरेंज कॅप देखील आहे.

शुभमन गिलच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला 234 धावांचे लक्ष्य दिले. क्रिकेट जगतातील सर्वजण शुभमन गिलचे कौतुक करत आहेत. सामन्यानंतर शुभमन गिलच्या कामगिरीने प्रभावित झालेला सचिन तेंडुलकरही त्याच्याशी हस्तांदोलन करताना दिसला. यादरम्यान सचिन तेंडुलकरही शुभमन गिलच्या कानात काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली.

गुजरात संघाला अंतिम फेरीत चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना करावा लागणार आहे, ज्याने चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा 15 धावांनी पराभूत केले. गिल व्यतिरिक्त साई सुदर्शन 31 चेंडूत 43 केल्या. गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 64 चेंडूत 138 धावांची भागीदारी केली. कर्णधार हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 28 धावांचे योगदान दिले. यासह गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताणा तीन गडी गमावून 233 धावा केल्या.

प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 18.2 षटकांत 171 धावांवर बाद झाला. त्याच्या संघातील केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. यामध्ये सूर्यकुमार यादवने 38 चेंडूत 61 तर टिळक वर्माने 14 चेंडूत 43 धावा केल्या. मोहित शर्माने 2.2 षटकात 10 धावा देत 5 बळी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.