IPL 2023: 59 चेंडूत ठोकल्या 95 धावा! तरीही शुभमन गिलवर दिग्गज खेळाडूने उपस्थित केले प्रश्न... | Shubman Gill | Cricket News Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubman Gill

IPL 2023: 59 चेंडूत ठोकल्या 95 धावा! तरीही शुभमन गिलवर दिग्गज खेळाडूने उपस्थित केले प्रश्न...

Shubman Gill IPL 2023 : गुजरात टायटन्सचा स्फोटक सलामीवीर शुभमन गिलला आऊट करणे गोलंदाजांसाठी कठीण जात आहे. हा युवा खेळाडू प्रत्येक सामन्यात धावांचा डोंगर उभा करत आहे. आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आता आयपीएलमध्ये गिलची बॅट जोरदार बोलत आहे. असे असतानाही माजी किवी दिग्गज क्रिकेटर सायमन डलने गिलच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गुजरातचा रविवारी सामना लखनौ सुपर जायंट्सशी झाला. या सामन्यात गिलने 51 चेंडूत 94 धावा केल्या. या खेळीत त्याने दोन चौकार आणि सात षटकार मारले. त्याने 184 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली पण गिलला निवृत्त व्हायला हवे होते असे डलला वाटले.

गिलच्या खेळीबद्दल बोलताना सायमन डल म्हणाला, 'शुबमन थकला होता. त्याला हवे तितके चौकार मारता आले नाहीत. आणि ते घडते. माझ्या या म्हणण्याने वाद निर्माण होऊ शकतो, पण मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा एखादा फलंदाज 45 चेंडूत 75 किंवा 80 धावा करेल आणि मग 45 डिग्री तापमानात शिजवल्यानंतर जेव्हा त्याला वाटले की तो खेळू शकत नाही, तेव्हा म्हणा, तेवतीया, तू आता ये. मी रिटायर होत आहे.

तो पुढे म्हणाला, “मी वेळोवेळी सांगत आलो आहे की या खेळात रेकॉर्डला काही फरक पडत नाही. मला माहित आहे की लोक अजूनही का म्हणतात शंभर, शंभर असत. पण जेव्हा तुम्ही हराल तेव्हा याचा काहीच अर्थ राहणार नाही.

तेव्हा डल म्हणाला, "जेव्हा मैदानावर कोणी म्हणेल की मी थकलो आहे आणि चौकार मारण्यास सक्षम नाही, तेव्हा त्यांनी इतर खेळाडूंना संधी द्यावी." तुमच्याकडे आक्रमक फलंदाजी असेल तर ती का वापरत नाही.