SRH vs DC Live Score : घरच्या मैदानावर हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सने केला 7 धावांनी पराभव | Cricket Score in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals 34th Match

SRH vs DC Live Score : घरच्या मैदानावर हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सने केला 7 धावांनी पराभव

IPL 2023 SRH vs DC : आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 137 धावा करू शकला.

घरच्या मैदानावर हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सने केला 7 धावांनी पराभव

आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा सात धावांनी पराभव केला.

हैदराबादला शेवटच्या 6 चेंडूत 13 धावांची गरज

हैदराबादला 19व्या षटकात 126 धावांवर सहावा धक्का बसला. नॉर्टजेने हेनरिक क्लासेनला अमन खानकरवी झेलबाद केले. त्याला 19 चेंडूत 31 धावा करता आल्या. हैदराबादला शेवटच्या सहा चेंडूत 13 धावांची गरज आहे.

अभिषेक शर्मा आऊट

अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. यासह हैदराबादची चौथी विकेट पडली. 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवने स्वत:च्याच चेंडूवर झेल घेतला.

  राहुल त्रिपाठी आऊट

13व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर राहुल त्रिपाठीची विकेट पडली आहे. इशांत शर्माचा चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक फिल सॉल्टच्या हातात गेला आणि अंपायरने दिल्लीच्या आवाहनावर बोट उचलले.

मयंक अग्रवालचे अर्धशतक हुकलं!  सनरायझर्स हैदराबादला दुसरा धक्का

हैदराबादला 12व्या षटकात 69 धावांवर दुसरा धक्का बसला आहे. मयंक अग्रवाल 39 चेंडूत 49 धावा करून बाद झाला. सध्या हैदराबादला 48 चेंडूत 72 धावांची गरज आहे.

 ब्रूक क्लीन बोल्ड! सनरायझर्स हैदराबादला 31 धावांवर पहिला धक्का!

हैदराबादला सहाव्या षटकात 31 धावांवर पहिला धक्का बसला. हॅरी ब्रूक 14 चेंडूत सात धावा करून बाद झाला. त्याला एनरिक नॉर्टजेने क्लीन बोल्ड केले. सध्या मयंक अग्रवाल 19 चेंडूत 28 आणि राहुल त्रिपाठी 1 धावा करत क्रीजवर आहे. हैदराबादला 84 चेंडूत 109 धावांची गरज आहे.

हैदराबादचा डाव सुरू 

हैदराबादचा डाव सुरू झाला आहे. हॅरी ब्रूक मयंक अग्रवालसह डावाची सुरुवात करण्यासाठी आला आहे. दिल्लीसाठी इशांत शर्मा पहिले षटक टाकत आहे.

SRH vs DC Live Score : सुंदर अन् भुवनेश्वरची कमाल! दिल्लीने हैदराबादला दिले 145 धावांचे लक्ष्य

दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावा केल्या.

दिल्लीला सात धक्का! अक्षरानंतर मनीष पांडेही आऊट 

18 व्या षटकात 131 धावांवर दिल्लीला सहावा धक्का बसला. अक्षर पटेल 34 चेंडूत 34 धावा करून भुवनेश्वरने क्लीन बोल्ड झाला. 62 धावांवर पाच विकेट पडल्यानंतर मनीष आणि अक्षर यांनी सहाव्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. यानंतर 19व्या षटकात मनीष पांडे धावबाद झाला. तो 27 चेंडूत 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मनीषने आपल्या खेळीत दोन चौकार मारले.

वॉशिंग्टन सुंदरने हादरवली दिल्ली! एका षटकात केल्या 3 शिकार

दिल्ली कॅपिटल्सला आठव्या षटकात तीन धक्के बसले. वॉशिंग्टन सुंदरने कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सर्फराज खान आणि अमन हकीम खान यांना एकाच षटकात बाद केले.

सर्वप्रथम सुंदरने वॉर्नरला झेलबाद केले. वॉर्नरला 20 चेंडूत 21 धावा करता आल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर चौथ्या चेंडूवर सर्फराज खानला भुवनेश्वर कुमारने झेलबाद केले. सर्फराजला नऊ चेंडूत एका षटकाराच्या जोरावर 10 धावा करता आल्या. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सुंदरने अमन हकीम खानला झेलबाद केले. अमनने चौकार लगावला.

दिल्लीची धावसंख्या 8 षटकांनंतर पाच बाद 62 अशी आहे. सध्या मनीष पांडे आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत.

दिल्लीला दुसरा धक्का, मिचेल मार्श 25 धावा करून आऊट

पाचव्या षटकात दिल्लीला दुसरा धक्का बसला. टी नटराजन मिचेल मार्शला एलबीडब्ल्यू केले. त्याला 15 चेंडूत 25 धावा करता आल्या. मार्शने आपल्या खेळीत पाच चौकार मारले.

SRH vs DC Live Score : भुवनेश्वरने दिल्लीला पहिल्याच षटकात दिला पहिला धक्का

दिल्ली संघाला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने फिलिप सॉल्टला यष्टिरक्षक हेनरिक क्लासेनवी झेलबाद केले.

दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. पृथ्वी शॉला संघातून वगळण्यात आले आहे. रिपल पटेल आणि सर्फराज खान प्लेइंग-11 मध्ये परतले आहेत.