Sunil Gavaskar IPL 2023 : गंभीरच्या मार्गदर्शनाखाली नवीन बघा कसा... गावसकरांचं भारतीय प्रशिक्षकांबद्दल मोठं वक्तव्य | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Gavaskar Indian Coaches In IPL

Sunil Gavaskar IPL 2023 : गंभीरच्या मार्गदर्शनाखाली नवीन बघा कसा... गावसकरांचं भारतीय प्रशिक्षकांबद्दल मोठं वक्तव्य

Sunil Gavaskar Indian Coaches In IPL : आयपीएलची लीग स्टेज संपून आता प्ले ऑफचे सामने सुरू झाले आहेत. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्ले ऑफचे तिकीट नक्की केले. आत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला क्वालिफाय सामना होत आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांची प्ले ऑफ खेळण्याची संधी थोडक्यात हुकली. बाकीच्या फ्रेंचायजींनी निराशा केली. याबाबत बोलताना भारताचे माजी महान खेळाडू सुनिल गावसकर यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की यंदाच्या हंगामात भारतीय प्रशिक्षकांनी उगवत्या गुणवत्तेला कशी मदत केली हे सांगितले.

स्पोर्ट्स स्टारमधील स्तंभात गावसकर लिहितात, 'चंदू पंडितांच्या मार्गदर्शनाखाली रिंकू सिंहची प्रगती पाहा. व्यंकटेश अय्यर आणि वरूण चक्रवर्तीनेही जबरदस्त पुनरागमन केलं आहे. नितीश राणा देखील कर्णधार म्हणून परिपक्व होतोय. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली रवी बिश्नोई, आयुष बदोनी, नवीन उल हक देखील प्रगती करतायत. आशिष नेहरा आणि हार्दिक पांड्याने देखील नवे सामनावीर शोधून काढले आहेत.'

गावसकर पुढे लिहितात, 'हे फक्त स्थानिक खेळाडूंशी संवाद साधणे आणि त्यांच्यापर्यंत पोहचणे सोपे झाल्याने होऊ शकले आहे. हे लक्षात ठेवा की विदेशी दिग्गज खेळाडू देखील त्यांना मार्गदर्शन आणि रस्ता दाखवू शकतात. मात्र तशी उदाहरणे खूप कमी आहेत. ती एक पद्धत अजून तरी झालेली नाही.' गावसकर म्हणाले की, आतापर्यंतच्या 15 विजेतेपदापैकी 12 विजेतेपदं ही भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वाखाली जिंकली गेली आहेत.

(Sports Latest News)