सनरायझर्स हैदराबादमधून ब्रायन लाराची हकालपट्टी, माजी दिग्गज खेळाडूची संघाच्या कोचपदी नियुक्ती | Sunrisers Hyderabad | Brian Lara | Daniel Vettori is new head coach SRH | SRH new head coach Daniel Vettori | Cricket News in Marathi | Daniel Vettori Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daniel Vettori is new head coach SRH

SRH New Coach: सनरायझर्स हैदराबादमधून ब्रायन लाराची हकालपट्टी, माजी दिग्गज खेळाडूची संघाच्या कोचपदी नियुक्ती

Daniel Vettori is new head coach Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद ही फ्रँचायझी टीम त्यांच्या नव्या कोचसोबत खेळणार आहे. वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराच्या प्रशिक्षणाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. आज ब्रायन लाराला संघातून वेगळा आणि सोशल मीडियावर नवीन कोचच्या नावाची घोषणा करण्यात आली.

न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा गेल्या मोसमापर्यंत ही जबाबदारी पार पाडत होता. संघ व्यवस्थापनाच्या वतीने सोमवार सोशल मीडियावर त्यांचे आभार मानले. 2023 मध्ये सनरायझर्स संघाने 14 पैकी 10 सामने गमावले होते.

सनरायझर्स हैदराबादने नवे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी संघात सामील झाल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी संघाच्या नव्या कोचच्या शोधाची माहिती दिली होती. आता नवीन प्रशिक्षक म्हणून व्हिटोरीच्या आगमनाची माहिती शेअर करण्यात आली आहे. सोशल मीडिया ट्विटमध्ये न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा फोटो शेअर करत लिहिले की, न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू ऑरेंज आर्मीमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू होणार आहे.

न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू डॅनियल व्हिटोरीने यापूर्वी 2014 ते 2018 या कालावधीत विराट कोहलीच्या कर्णधारपदी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. ते संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. आरसीबीकडून त्याने काही हंगामात संघाचे नेतृत्वही केले.