CSK IPL 2023 : आमच्या कार्यकर्त्यामुळे CSK ने आयपीएल जिंकले.... तमिळनाडू BJP अध्यक्षांचं अजब वक्तव्य | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK IPL 2023 Tamil Nadu BJP President

CSK IPL 2023 : आमच्या कार्यकर्त्यामुळे CSK ने आयपीएल जिंकले.... तमिळनाडू BJP अध्यक्षांचं अजब वक्तव्य

CSK IPL 2023 Tamil Nadu BJP President : चेन्नई सुपर किंग्जने 15 षटकात 171 धावांचा डोंगर पार करत पाचव्यांदा आयपीएलवर आपले नाव कोरले. चेन्नईने पावसामुळे सामना जिंकणे अवघड झाला असतानाही गुजरातला त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभूत केले. या सामन्यात चेन्नईच्या प्रत्येक फलंदाजाने आपले योगदान देत विजयात वाटा उचलला.

मात्र तमिळनाडू भाजप अध्यक्ष के अन्नामलाई यांचे याबाबत वेगळेच मत आहे. आयपीएल 2023 फायनलनंतर त्यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच व्हायर होत आहेत. ते म्हणाले की चेन्नईने हा सामना जिंकला कारण त्यात एक भाजप कार्यकर्ता खेळत होता. या कार्यकर्त्याने चेन्नईने गुजरात टायटन्स सामना हरला. अन्नामलाई यांनी हे वक्तव्य तमिळनाडूच्या एका न्यूज चॅनलवर केले.

अन्नामलाई म्हणाले की, 'एका भाजप कार्यकर्त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघाला विजयी धाव काढून दिली. रविंद्र जडेजा भाजप कार्यकर्ता आहे तो गुजरातचा आहे. त्यांची पत्नी भाजपची आमदार आहे. आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्याने सीएसकेसाठी विजयी धाव घेतल्याचा अभिमान आहे.'

अन्नामलाई पुढे म्हणाले की, 'मला एक तमिलियन असल्याचा देखील गर्व आहे. सीएसकेपेक्षा गुजरातमध्ये जास्त तमिळ खेळाडू होते. मी त्यांच्यासाठी देखील जल्लोष करेन. एक तमिळ खेळाडू साई सुदर्शनने 96 धावा केल्या. आम्ही त्याचा देखील जल्लोष करू. सीएसकेमध्ये एकही तमिळ खेळाडू नव्हता. मात्र तरी देखील आम्ही एमएस धोनीमुळे सीएसकेसाठी खूष आहोत.'

जडेजा खरंच भाजप कार्यकर्ता आहे?

तमिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांना दावा केला आहे की रविंद्र जडेजा हा भाजप कार्यकर्ता आहे. रविंद्र जडेजाने अनेकवेळा भाजपच्या समर्थन केले आहे. 2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत रविंद्र जडेजाची पत्नी जामनगर उत्तर सीटवरून निवडणूक लढवली होती. तिने 80 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडणूक जिंकली होती. यापूर्वी 2019 मध्ये रिवाबा जडेजाने अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर जडेजाने भाजपला समर्थन करणारे ट्विट केले होते.

(Sports Latest News)