
Team India : BCCI अन् कर्णधार रोहितने संपवली 'या' 2 दिग्गज खेळाडूंची कारकीर्द!
Team India : निवड समितीने भारताच्या दोन बलाढ्य क्रिकेटपटूंची कारकीर्द संपवली आहे. बीसीसीआयने या खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान मिळण्यासाठी योग्य मानले नाही. भारताच्या या तीन खेळाडूंची कसोटी कारकीर्द जवळपास संपली असून भारतीय कसोटी संघाचे दरवाजेही त्यांच्यासाठी बंद झाले आहेत, मात्र त्यांनी अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही.
भारतीय क्रिकेट संघात निवड होणे जितके कठीण मानले जाते तितकेच टीम इंडियामध्ये स्वतःला टिकवून ठेवणे कितीतरी पटीने कठीण आहे, कारण संघाबाहेर असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर मजबूत स्पर्धा देतात.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची कसोटी कारकीर्द जवळपास संपली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी निवडकर्त्यांनी या खेळाडूला किंमतही दिली नाही. नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कानपूर कसोटीत इशांत शर्मा शेवटचा दिसला होता. त्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे. शमी, उमेश आणि सिराजसारखे गोलंदाज कसोटी फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियातून इशांत शर्माचा पत्ता कट झाला आहे. इशांतने 100 हून अधिक कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने 311 बळी घेतले आहेत.
ऋद्धिमान साहा खूप चांगला यष्टिरक्षक आहे. मात्र, निवडकर्त्यांनी या खेळाडूला किंमतही दिली नाही. ऋद्धिमान साहाने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो आतापर्यंत केवळ 40 कसोटी सामने खेळू शकला आहे.
त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता या खेळाडूची पुन्हा कसोटी संघात पुनरागमन होण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे. साहाच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 40 कसोटीत 29.41 च्या सरासरीने 1353 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकली आहेत.