IPL 2022: पंजाब-हैदराबादमध्ये आज औपचारिक लढत

आयपीएलमध्ये पहिले चार संघ निश्चित झालेले असताना सहा संघांचे आव्हान संपलेले
today ipl match srh vs pbks
today ipl match srh vs pbksसकाळ

IPL 2022: आयपीएलमध्ये पहिले चार संघ निश्चित झालेले असताना सहा संघांचे आव्हान संपलेले आहे. यातील पंजाब आणि हैदराबाद यांच्यात उद्या अखेरचा साखळी सामना होत आहे. या सामन्यातील विजयी संघ एकमेकांमधील क्रमवारी निश्चित करेल, एवढेच महत्त्व या सामन्याला असणार आहे.

स्पर्धेची क्रमवारी निश्चित झालेली असताना शिल्लक राहिलेल्या अखेरच्या सामन्याला डेड रबर असे म्हटले जाते. उद्याचा हा सामना त्याच धर्तीचा आहे. विजय मिळवून यंदाच्या मोसमाची विजयाने सांगता करणे, हेच उद्दिष्ट उद्या दोन्ही संघांसमोर असणार आहे.

अखेरचा सामना असल्यामुळे दोन्ही संघातील राखीव खेळाडूंना उद्या संधी दिली जाऊ शकते. हैदराबादला तर नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर केन विल्यम्सन मायदेशी रवाना झाला होता. निकोलस पूरन हा त्यांचा नवा कर्णधार असू शकेल. पोलार्डने निवृत्ती जाहीर केल्यामुळे वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारपदी पूरनची निवड झालेली आहे.

पंजाब संघातही कर्णधार बदल अपेक्षित आहे. एरवी सलामीला खेळणारा मयांक अगरवाल फॉर्मात नसल्यामुळे शिखर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com