IPL 2021: मराठमोळ्या केदारवर भडकला लारा, वाचा, काय आहे प्रकरण

Brian-Lara-Kedar-Jadhav
Brian-Lara-Kedar-Jadhav
Summary

केदार जाधवने हैदराबाद-दिल्ली सामन्यात असं काही केलं की...

IPL 2021 DC vs SRH: हैदराबाद संघाचा दिल्लीने ८ गडी राखून धुव्वा उडवला. तळाशी असलेल्या हैदराबादला कालच्या सामन्यातील पराभवामुळे मोठा फटका बसला. हैदराबादचे 'प्ले-ऑफ्स'चे गणित अधिकच फिसकटले. चेन्नईसाठी 'अवघड जागीचं दुखणं' झालेल्या केदार जाधवला हैदराबाद संघाने खरेदी केले. हैदराबादच्या संघातून दिल्लीविरूद्धच्या सामन्यात केदारला संधी मिळाली. पण त्याला फारशी छाप पाडता आली नाही. ८ चेंडूत केवळ ३ धावा काढून तो बाद झाला. केदारने या सामन्यात एक अशी गोष्ट केली, ज्यावरून महान फलंदाज ब्रायन लारा केदारवर चांगलाच संतापला.

Brian-Lara-Kedar-Jadhav
IPL 2021: "लाज वाटते"; SRHच्या पराभवानंतर विल्यमसन हवालदिल

वाचा, नक्की काय आहे प्रकरण

दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज ऑनरिक नॉर्टजे याने केदार जाधवचा काटा काढला. त्याने टाकलेला चेंडू वेगाने आला आणि केदारच्या पायावर आदळला. केदारला चेंडू खेळता न आल्याने तो पूर्णपणे स्टंपच्या मध्यातच राहिला आणि पायचीत झाला. तो बाद झाल्यानंतर त्याने DRS घेतला. त्याच्या बाद होण्याबाबत प्रथमदर्शनी काहीच शंका नव्हती. तरीही केदारने DRS घेतला. त्यामुळे लारा त्याच्यावर चांगलाच भडकला. अशाप्रकारे बाद झाल्यानंतर त्याने DRS ची मदत घेतली यावर माझा विश्वासच नाही, असं लारा म्हणाला.

असा बाद झाला केदार जाधव (Video)

Brian-Lara-Kedar-Jadhav
IPL 2021 DC vs SRH : पंत-अय्यरचा फिनिशिंग टच; दिल्लीनं घेतली चेन्नईची जागा

काय म्हणाला लारा..

"नॉर्टजेची गोलंदाजी पाहून एक गोष्ट स्पष्ट दिसते की दक्षिण आफ्रिकेच्या संघातून हे लोक खेळतात आणि IPL मध्ये त्यांची कामगिरी अधिकच बहरते. नॉर्ये हा प्रतिभावान गोलंदाज आहे. तो सरळ आणि वेगवान गोलंदाजी करतो. फलंदाजाला फटकेबाजी करण्यासाठी तो फारशी जागा देत नाही. केदारची विकेट अशा एका उत्तम गोलंदाजीचा नमुना होता. तो बाद आहे हे स्पष्टपणे दिसत होतं. अशा वेळी तुम्ही DRS घेताचं कसं काय? अशा विकेटनंतर रिव्ह्यू घेणं हे अनाकलनीय आहे. मला तर यावर विश्वासच बसत नाही. हा असं का करतोय हीच माझी पहिली प्रतिक्रिया आहे", असं लाराने स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com