
Suryakumar Yadav Virat Kohli : विराटच्या शतकानंतर सूर्याने केली परतफेड; म्हणाला...
Suryakumar Yadav Virat Kohli IPL 2023 : स्लो स्ट्राईक रेटच्या खेळी करतो अशी टीका होत असतानाच विराट कोहलीने 63 चेंडूत शतकी खेळी करत सर्वांची तोंडे बंद केली. विराट कोहलीने आयपीएलमधील आपले सहावे शतक ठोकले. या शतकामुळे आरसीबीचे प्ले ऑफचे स्वप्न जिवंत राहिले. आरसीबीने सनराईजर्स हैदराबादचे 187 धावांचे आव्हान 4 चेंडू राखून पार केले. विराट कोहलीच्या या सामना जिंकून देणाऱ्या शतकी खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. विराट कोहलीच्या फॅन्सप्रमाणे सूर्यकुमार यादवनेही विराट कोहलीच्या शतकी खेळीचे तोंडभरून कौतुक केलं आहे.
मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने काही दिवसांपूर्वीत शतकी खेळी केली होती. याचे विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत कौतुक केले होते. आता सूर्यकुमार यादवने देखील त्याच स्टाईलमध्ये विराट कोहलीने शतक केल्यावर त्याचे कौतुक केलं. सूर्यकुमार यादवने विराट कोहलीचा शतक सेलिब्रेट करतानाचा फोटो शेअर करत त्याला मानलं रे भाऊ अस कॅप्शन दिले.

विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवने शतक ठोकल्यानंतर आरसीबीने देखील त्याचे कौतुक केले होते. सूर्यकुमार यादवने गुजरात टायटन्सविरूद्ध शतकी धमाका केला होता. आरसीबी विरूद्ध एसआरएच सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने आरसीबीसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. हेन्री क्लासेनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 51 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली.
यानंतर आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी 172 धावांची तगडी सलामी देत एकहाती सामना फिरवला. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावा केल्या तर फाफ ड्युप्लेसिसने 71 धावांची खेळी केली. मात्र तरी देखील हैदराबादने सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला. अखेर आरसीबीने 4 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेने आपले एक पाऊल पुढे टाकले.