फॉर्म वापसीनंतर विराटचे 'अर्धशतकी' रेकॉर्ड; हा कारनामा पहिल्यांदाच झाला | Virat Kohli Became First Batsmen | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli IPL Record

फॉर्म वापसीनंतर विराटचे 'अर्धशतकी' रेकॉर्ड; हा कारनामा पहिल्यांदाच झाला

गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा फॉर्ममध्ये परत असल्याचे दिसले. त्यामुळे विराटच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र विराट कोहलीची ही फॉर्म वापसी आरसीबीसाठी काही फारशी फळाला आली नाही. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला. असे असले तरी सामन्यात विराट कोहलीचीच चर्चा होती. विराट या सामन्यात फक्त फॉर्ममध्ये आला नाही तर त्याने विक्रमी अर्धशतक (Record Half Century) देखील ठोकले. विशेष म्हणजे 15 आयपीएल डावांनंतर विराट कोहलीच्या बॅटमधून अर्धशतक झळकले.

हेही वाचा: RCB vs GT : विराट खेळीनंतरही आरसीबी हरली!

विराट कोहली आता टी 20 क्रिकेटमध्ये एका संघाकडून अर्धशतकांचे अर्धशतक पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने गुजरात विरूद्धच्या सामन्यात 58 धावांची खेळी केली. यात 1 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. त्याने आरसीबीकडून खेळताना आपले अर्धशतकांचे अर्धशतक पूर्ण केले.

टी 20 क्रिकेटमध्ये एका संघाकडून सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणारे फलंदाज

विराट कोहली - आरसीबी - 50

डेव्हिड वॉर्नर - हैदराबाद - 42

सुरेश रैना - सीएसके - 40

एबी डिव्हिलियर्स - आरसीबी - 39

हेही वाचा: ब्रेकिंग : चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद पुन्हा धोनीकडे

विराट कोहलीचे हे रेकॉर्ड तोडणे कठिण आहे. सनराईजर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्न हा आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. तर सुरेश रैना आणि एबी डिव्हिलियर्सने आयपीएल खेळणे बंद केले आहे. आरसीबीने गुजरात टायटन्स विरूद्ध 170 धावा केल्या. त्यात विराट कोहलीच्या 58 तर रजत पाटीदारच्या 53 धावांचा समावेश होता. मात्र गुजरातने हे आव्हान 19.3 षटकात पार करत आपला आठवा सामना जिंकला. याचबरोबर ते 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचले. तर आरसीबी 10 सामन्यापैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Web Title: Virat Kohli Became First Batsmen To Hit 50 Half Century For One Team In T20 Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top