Virat Kohli IPL Records : टी 20 कारकीर्द संपल्याची चर्चा सुरू असतानाच विराट कोहलीनं इतिहास रचला| Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli IPL Records

Virat Kohli IPL Records : टी 20 कारकीर्द संपल्याची चर्चा सुरू असतानाच विराट कोहलीनं इतिहास रचला

Virat Kohli IPL Records : विराट कोहली हा आक्रमक आहे, धावांचा पाऊस पाडतो, अर्धशतकांचा, शतकांचा रतीबच घालतो मात्र त्याचे स्ट्राईक रेट टी 20 ला साजेसं नाही. या सर्व टीका करणाऱ्या टीकारांना विराट कोहलीच्या शतकानेच गपगार केलं. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावा ठोकल्या आणि आरसीबीच्या विजयाचा एकटा वाटेकरी ठरला.

विशेष म्हणजे विराट कोहलीची ही शतकी खेळी अनेक विक्रम करून गेली. विराट कोहली आता आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा भारतीय फलंदाज बनला आहे. याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम असलेल्या ख्रिस गेलसोबतही त्याने बरोबरी साधली आहे. आजचे विराटचे हे शतक आयपीएल इतिहासातील सहावे शतक ठरले. ख्रिस गेलने देखील आयपीएलमध्ये 6 शतके ठोकली आहेत. आता विराट आणि गेल आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहेत.

विराट कोहलीने आज केलेले विक्रम

- विराट कोहलीने आरसीबीकडून 7500 धावा पूर्ण केल्या.

- आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीने 500 धावा पूर्ण केल्या.

- सर्वाधिक टी 20 शतके ठोकणारा भारतीय फलंदाज.

- गेल्या हंगामात हैदराबादविरूद्ध शुन्यावर बाद 2023 मध्ये ठोकले शतक

सनराईजर्स हैदराबादच्या हेन्रिच क्लासेनने शतकी खेळी करत आरसीबसमोर 187 धावांचे मोठे आव्हान ठेवले. मात्र क्लासेनच्या या शतकाला विराट कोहलीने देखील शतकी उत्तर दिले. विराट कोहलीने 63 चेंडूत शतक ठोकले. या शतकी जोरावर आरसीबीने हैदराबादचे 187 धावांचे आव्हान 19.2 षटकात दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. आरसीबीकडून फाफ ड्युप्लेसिसने 71 धावांची खेळी केली. या दोघांनी 172 धावांची दमदार सलामी दिली.

गुणतालिकेचा विचार केला तर आरसीबीने आजचा सामना जिंकून आपली गुणसंख्या 14 केली आहे. त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले असून मुंबई इंडियन्सला पाचव्या स्थानावर ढकलले. आरसीबीला आपले प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी गुजरात टायटन्सविरूद्धचा सामना जिंकावा लागणार आहे.

(Sports Latest News)