WTC Final : WTC फायनलपूर्वी कर्णधार रोहितसाठी वाजवली धोक्याची घंटा! संघाचा घातक फलंदाज झाला जखमी | Virat Kohli Injury | Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी अन्...
virat kohli injury in rcb vs gt match ipl 2023 befor world test championship final team india ind vs aus cricket news in marathi

WTC Final : WTC फायनलपूर्वी कर्णधार रोहितसाठी वाजवली धोक्याची घंटा! संघाचा घातक फलंदाज झाला जखमी

Virat Kohli Injury in RCB vs GT Match IPL 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळल्या जाणार आहे. 2019-21 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. अंतिम फेरीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांची घोषणा आधीच झाली आहे. पण आता डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी स्टार भारतीय फलंदाज जखमी झाला आहे.

आयपीएल 2023 चा 70 वा सामना आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवासह आरसीबी संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

गुजरातच्या डावातील 15 वे षटक विजय कुमारने केले. या षटकातील पाचव्या चेंडूवर गुजरातचा फलंदाज विजय शंकरने एक लांबलचक शॉट मारला, पण विराट कोहलीने उत्कृष्ट चपळाई दाखवत झेल घेतला, पण त्यामुळे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि तो परत आलाच नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपपूर्वी कोहलीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढणार आहेत.

Virat Kohli Injury

Virat Kohli Injury

आरसीबीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. पण मला त्यात काही गंभीर वाटत नाही. 4 दिवसात त्याने दोन शतके झळकावली आहेत. तो एक असा खेळाडू आहे ज्याला फलंदाजीव्यतिरिक्त क्षेत्ररक्षणातही योगदान द्यायचे आहे. तो आपले सर्वोत्तम देत आहे. त्याची दुखापत फारशी गंभीर नाही.

विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेला तो भारतासाठी सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे. कोहलीने भारतासाठी 108 कसोटीत 8416 धावा केल्या आहेत, ज्यात 28 शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे.