'आता पाहिजे महिला आयपीएल' फॅन्स देतायत जोरदार घोषणा

सुपरनोव्हा आणि व्हेलॉसिटी यांच्यात खेळल्या गेलेल्या रोमांचक असा अंतिम सामना पाहिला मिळाला.
women ipl 2023
women ipl 2023

Women IPL 2023: महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा 2022 चा अंतिम सामना सुपरनोव्हा आणि व्हिलॉसिटी त्याच्यामध्ये खेळला गेला. सामन्यादरम्यान महिला खेळाडूंच्या कामगिरीने पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावले आहे. स्पर्धेत केवळ एकाच संघाने सर्व संघाने जिकंले आहे. तरीही सर्वच खेळाडूंनी आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकले आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान एक अप्रतिम दृश्य पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

women ipl 2023
IPL Closing Ceremony चे फोटो व्हायरल, रिहर्सल करताना दिसले स्टार

सुपरनोव्हा आणि व्हेलॉसिटी यांच्यात खेळल्या गेलेल्या रोमांचक असा अंतिम सामना पाहिला मिळाला. सामन्यात एक क्षण असा होता जेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या महिला आयपीएलच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत होत्या. गर्दीत बसलेल्या महिला म्हणाल्या, आम्हाला महिला आयपीएल हवी. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धाची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. तेव्हापासून स्पर्धेचे चार हंगाम आयोजित केले आहेत. बीसीसीआयकडून स्पष्टपणे सूचित केले आहे की पुढील वर्षापासून चाहत्यांना महिला टी -20 चॅलेंज स्पर्धा पाहिला मिळणार नाही, तर महिला आयपीएल सुरु होणार आहे.

women ipl 2023
SPN vs VEL : सिमनच्या हातून बॅट अन् सामना दोन्ही निसटला

कालच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेगवान संघाने नाणेफेक जिंकून फायनलमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर डिआंड्रा डॉटिन आणि हरमनप्रीत कौर यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाने व्हेलॉसिटीसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यानंतर लॉरा वॉलवर्डने 65 धावांची शानदार खेळी खेळली, ज्याच्या जोरावर संघाने 161 धावा केल्या. मात्र, असे असतानाही त्यांना सुपरनोव्हाविरुद्ध 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com