Team India WTC Final: टीम इंडियाची WTC फायनलसाठी ही असेल प्लेइंग-11! कर्णधार रोहित या खेळाडूना देणार संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India WTC Final

Team India WTC Final: टीम इंडियाची WTC फायनलसाठी ही असेल प्लेइंग-11! कर्णधार रोहित या खेळाडूना देणार संधी

Team India WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे. 7 जून रोजी ओव्हलच्या मैदानावर टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियन संघ असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू सतत आयपीएल खेळत होते. अशा स्थितीत संघ निवडीवर मोठा परिणाम होणार आहे. या रिपोर्टमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असू शकते हे पाहू.

शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंगची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. शुभमनने नुकतीच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली आहे. त्याचवेळी कर्णधार रोहितचा फॉर्म निश्चितच चिंतेचा विषय आहे. मात्र या दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली.

त्याचवेळी चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. पुजारा बराच काळ काऊंटी खेळत आहे. त्याने ससेक्सचे कर्णधारपद भूषवले आहे आणि त्याच्याकडून फायनलमध्ये टीम इंडिया खूप आशा आहे. त्याचवेळी संघाचा सर्वात मोठा स्टार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर उतरणार आहे.

आयपीएलमध्ये विराटची बॅटही खूप बोलली आणि तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणेचे 12व्या क्रमांकावर उतरणे निश्चित आहे. रहाणेने नुकतेच देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

तर केएस भरत यष्टिरक्षक म्हणून खेळणार आहे. अलीकडेच त्याची बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेसाठी संघात निवड झाली. पण त्याची कामगिरी चांगली झाली नाही. त्याच वेळी इशान किशनची देखील X फॅक्टर म्हणून निवड केली जाऊ शकते.

रवींद्र जडेजा संघात फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसतो. इंग्लिश खेळपट्टीवर दोन फिरकी गोलंदाजांची गरज भासणार नाही, अशा स्थितीत रवी अश्विन आणि अक्षर पटेल यांना संधी मिळणे फार कठीण आहे.

त्याचबरोबर इंग्लंडमध्ये तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळणार आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव या तीन गोलंदाजांना संघात स्थान मिळू शकते. शमी आणि सिराज यांनीही आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्याचबरोबर उमेश यादवही या सामन्यापूर्वी तंदुरुस्त झाला आहे.

WTC फायनलसाठी भारताचे संभाव्य 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.