WTC Final Team India : MI सोबत टीम इंडियालाही मोठा धक्का! WTC फायनलपूर्वी हा मोठा खेळाडू झाला जखमी | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final Team India

WTC Final Team India : MI सोबत टीम इंडियालाही मोठा धक्का! WTC फायनलपूर्वी हा मोठा खेळाडू झाला जखमी

WTC Final Team India : भारतीय संघाला आयपीएल 2023 नंतर लंडनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया आधीच श्रेयस अय्यर, केएल राहुल, जसप्रीत बुमराह या खेळाडूंच्या दुखापतीने नको नको झाले आहे.

त्यात आयपीएल 2023 च्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा एक मोठा खेळाडू गुजरात टायटन्स विरुद्ध जखमी झाला. त्यामुळे संघाची चिंता वाढू शकते. विशेष म्हणजे दुखापतीनंतर तो खेळाडू फलंदाजीलाही उतरू शकला नाही.

खरंतर हा प्रकार मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीदरम्यान घडला, जेव्हा इशान किशन षटकांच्या मध्ये बाजू बदलत होता, तेव्हाच ख्रिस जॉर्डनच्या कोपरला त्याच्या डोळ्याला धक्का लागला. यानंतर इशानला वेदना होत असल्याचे दिसल्याने त्याने मैदान सोडले. त्याच्या जागी विष्णू विनोद मैदानावर आला.

त्यानंतर फलंदाजीमध्येही किशन सलामीला आला नाही आणि त्याच्या जागी नेहल वढेराने रोहितसह डावाला सुरुवात केली. डावाच्या पाचव्या षटकाच्या आधी आलेली अपडेट अशी होती की किशन दुखापतग्रस्त आहे आणि तो फलंदाजी करू शकणार नाही.

मात्र, इशानच्या फिटनेसचे संपूर्ण अपडेट अद्याप समोर आलेले नाही. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर सुमारे 10 दिवसांनंतर होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो.

केएल राहुलच्या जागी किशनला संघात आणण्यात आले होते. त्याला अजून कसोटी पदार्पण व्हायचे आहे. कोणाला संधी मिळणार, किशन की भरत, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. आता सर्वांच्या नजरा इशान किशनच्या दुखापतीकडे आसणार आहे.

त्याच्याशिवाय, संघात उपस्थित असलेल्या जयदेव उनाडकटच्या फिटनेसबाबत अद्याप अपडेट येणे बाकी आहे. आयपीएलमध्येच नेट प्रॅक्टिसमध्ये त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. तो आयपीएलमधून बाहेर पडला होता पण WTC साठी अपडेट येणे बाकी आहे.

WTC फायनलसाठी टीम इंडियाचा 15 सदस्यीय संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट .