
Yash Dayal : साक्षी हत्याकांडानंतर यश दयालची वादग्रस्त इन्स्टा स्टोरी; अखेर IPL स्टारचा खुलासा, अन्...
Yash Dayal Instagram Story : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयाल आज सोशल मीडियावर अचानक ट्रेंड करू लागला. यश दयाल त्याच्या कोणत्याही दमदार कामगिरीमुळे नाही तर त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. दिल्लीच्या साक्षी हत्याकांड प्रकरणानंतर यश दयालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लव्ह जिहादच्या संदर्भाने इन्स्टाग्राम सोटरी शेअर केली होती. त्यानंतर तो तुफान ट्रोल होत आहे. ट्रोल होऊ लागल्यानंतर यश दयालने माफी देखील मागितली आहे.
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालने आज सोमवारी सकाळी पोस्ट शेअर केली. या पोस्टमधील फोटोत एक टोपी घातलेला मुलगा हातात चाकू घेऊन गुडघ्यावर बसलेला दिसतोय. त्याने एका मुलीचा हात धरला आहे. त्या मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. याच फोटोत शेजारी एका मुलीचा मृतदेह ठेवलेला आहे त्यावर साक्षी असं लिहिलेलं आहे.
यश दयालच्या या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जाऊ लागले. चाहत्यांना यश दयालला अशा प्रकारे द्वेष पसरवू नये असे सांगितले. याचबरोबर त्यांनी गुजरात टायटन्समध्ये तू मोहम्मद शमी आणि राशिद खान यांच्यासोबत खेळत असताना तू असं कसं करू शकतो असे देखील विचारले. काहींनी तर मुस्लीम विरोधी ठरवले. यानंतर यश दयालने आपली चूक मान्य करत या स्टोरीसाठी माफी मागितली.
यश दयालने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले की, 'मित्रांनो मी माझ्या स्टोरीसाठी माफी मागतो. माझ्याकडून चुकून ही पोस्ट झाली. कृपा करून द्वेष पसरवू नका मी सर्व धर्मांचा आदर करतो.'