GT vs RR : अखेर चहलने 'खास' विक्रम करून दाखवलाच

Yuzvendra Chahal Became Spinner Who Took Most wickets in an IPL season
Yuzvendra Chahal Became Spinner Who Took Most wickets in an IPL season ESAKAL

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. त्याने चांगला कमबॅक करत आपली टीम इंडियातील दावेदारी सिद्ध करून दाखवली आहे. आजच्या फायनल सामन्यात देखील त्याने राजस्थान रॉयल्स अडचणीत सापडली असताना आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याने कर्णधार हार्दिक पांड्याला 34 धावांवर बाद करत गुजरातची 63 धावांची भागीदारी करणारी जोडी फोडली.

विशेष म्हणजे युझवेंद्र चहलने आपला हंगामातील 27 बळी टिपला. याचबरोबर तो पर्पल कॅपच्या रेसमध्ये वानिंदू हसरंगाला पिछाडीवर अव्वल स्थान पटकावले. युझवेंद्र चहलने फक्त पर्पल कॅप आपल्याच डोक्यावर येईल अशी कामगिरी केली नाही तर त्याने एक इतिहास देखील रचला. त्याने एखाद्या स्पिनरने एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम इम्रान ताहिरच्या नावावर होता. त्याने 2019 च्या हंगामात 26 विकेट घेतल्या होत्या. आता युझवेंद्र चहलने एका हंगामात 27 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम यापूर्वी कोणही केला नव्हता. एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत इम्रान ताहिर आणि वानिंदू हसरंगा (2022) 26 विकेट घेऊन दुसऱ्या स्थानावर आहेत. तर तिसऱ्या स्थानावर प्रत्येकी 24 विकेट घेणारे सुनिल नारायण (2012) आणि हरभजन सिंग (2013) हे आहेत.

आयपीएलच्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला 130 धावात रोखले. राजस्थानकडून जॉस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या. तर गुजरातकडून हार्दिक पांड्याने 17 धावात 3 तर साई किशोरने 20 धावा 2 विकेट घेतल्या. यानंतर 130 धावांचा पाठलाग करताना गुजरातने पहिल्या दोन विकेट स्वस्तात गमावल्या. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलने तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचत संघाला सावरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com