WTC Team India: BCCI ची मोठी घोषणा! kl राहुलची जागा घेतला हा धाकड, या तिघांनीही मिळवली टीम इंडियात जागा | Ishan Kishan | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC 2023 Team India

WTC Team India: BCCI ची मोठी घोषणा! kl राहुलची जागा घेतला हा धाकड, या तिघांनीही मिळवली टीम इंडियात जागा

WTC 2023 Team India : भारतीय क्रिकेट संघाला लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे.

परंतु काही दिवसांपासून भारतीय संघाचे स्टार खेळाडू आयपीएल 2023 दरम्यान गंभीर जखमी झाला होता. या लीगमध्ये तसेच वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी इशान किशनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

केएल राहुल आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत होता. एका सामन्यादरम्यान चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता त्याला आयपीएल 2023 आणि कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडावे लागले. दुसरीकडे इशान किशन सध्या आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.

बीसीसीआयने इंग्लंडला जाणाऱ्या संघात तीन स्टँडबाय खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यात सलामीवीर गायकवाड, मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांचा समावेश आहे.

भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन.

स्टँडबाय खेळाडू- ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार